श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना आज कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळला जात आहे. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनसमोर आता टी-२० मालिकाविजयाचे ध्येय आहे. दुसरीकडे दासुन शनाकाच्या नेतृत्वातील दासुन शनाकाला मागील पराभव विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल. वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल, हे नक्की. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
धाकड सलामीवीर पृथ्वी शॉ आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हे आज टीम इंडियाकडून टी-२० पदार्पण करत आहेत. वरुण टीम इंडियामध्ये याआधी दाखल झाला होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
T20I debuts for @PrithviShaw & @chakaravarthy29!
Go well, boys! #TeamIndia #SLvIND
Follow the match https://t.co/GGk4rj2ror pic.twitter.com/BaHp97vyFF
— BCCI (@BCCI) July 25, 2021
Hello & Good Evening from Colombo!
Sri Lanka have won the toss & elected to bowl against #TeamIndia in the T20I series opener. #SLvINDFollow the match https://t.co/GGk4rj2ror
Here’s India’s Playing XI pic.twitter.com/hUy5WRptfp
— BCCI (@BCCI) July 25, 2021
टीम इंडिया टी-२० मधील दुसर्या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ टी-२० मधील कमकुवत संघ आहे. संघाने सर्वाधिक टी-२० सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने वनडेतील कामगिरीची पुनरावृत्ती केली, तर मालिका जिंकण्यात फारशी अडचण येणार नाही.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, यजुर्वेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार.
श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असालांका, दासुन शनाका (कर्णधार), अशेन बंडारा, वनिदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंथा चमीरा.