WTC Final, Steve Smith Record At Lords: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्टेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शानदार अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने असा रेकॉर्ड करून दाखवला आहे, जो गेल्या ९९ वर्षांत कोणालाच करता आला नव्हता. यासह पुढील १०० वर्षांत कोणालाही मोडता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाची सुरूवात

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. या डावातील १०० धावा पूर्ण होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. संघ अडचणीत असताना स्टीव्ह स्मिथ खंबीरपणे उभा राहिला. त्याने या डावात दमदार अर्धशतकी खेळी केली.

स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास

या डावात फलंदाजी करताना स्मिथने ११२ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात होते. मात्र स्टीव्ह स्मिथने एक बाजू धरून ठेवली होती. हा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. स्टीव्ह स्मिथ हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज वॉरेन बार्डस्लेचा ९९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गेल्या ९९ वर्षांपासून वॉरेन बार्डस्ले या रेकॉर्डच्या यादीत अव्वल स्थानी होते.

लॉर्ड्सच्या मैदानावरील लॉर्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉरेन बार्डस्ले यांनी १९०९ पासून ते १९२६ दरम्यान ५ लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना ५ सामन्यांतील ७ डावात ५७५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी २ शतक आणि २ अर्धशतकं झळकावली होती. आता लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करताच, स्मिथने ५९१ धावा केल्या आहेत. या मैदानावर खेळताना त्याने २ शतक आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्याकडे या मैदानावर फलंदाजी करताना ६०० धावांचा पल्ला गाठण्याची संधी असणार आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच परदेशी फलंदाज ठरू शकतो. हा रेकॉर्ड मोडणं खूप कठीण आहे.