ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांची सतत एकमेकांशी तुलना होते. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत होते. त्यामुळे दोघांना टीकेचा सामनाही करावा लागला. सरतेशेवटी स्टीव्ह स्मिथ फॉर्ममध्ये आला आहे. श्रीलंकविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे आता विराट कोहली कधी फॉर्ममध्ये परतणार? असा प्रश्न चाहते सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने कठीण परिस्थितीत शतक झळकावले. स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील हे २८वे शतक ठरले. अशी कामगिरी करून त्याने शतकांच्या बाबतीत भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. आता तो ‘फॅब-४’मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनला आहे. स्मिथ आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटच्या नावावर प्रत्येकी २८ शतकांची नोंद आहे. तर, विराट कोहलीची २७ आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची २४ शतके आहेत.

हेही वाचा – कामरान अकमलच्या बोकडाची झाली चोरी! बकरी ईदच्या कुर्बानीसाठी केला होता खरेदी

तीन वर्षांपासून विराट सोसतोय धावांचा दुष्काळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा माजी कर्णधार असलेला विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांपैकी एक समजला जातो. मात्र, जवळपास गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या फलंदाजीची धार बोथट झाली आहे. विराटने २०१९ सालापासून क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एकही शतक झळकावलेले नाही. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. २०१९पासून विराटने १८ कसोटी सामन्यांतील ३२ डावांमध्ये २७च्या सरासरीने फक्त ८७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही.