scorecardresearch

Premium

IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ की विराट कोहली, कसोटी क्रिकेटमध्ये कोण आहे सर्वोत्तम? पाहा दोघांची आकडेवारी

IND vs AUS WTC Final 2023: सध्या लंडनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत डब्ल्यूटीसी फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने विक्रम शतक झळकावले आहे.

Virat Kohli vs Steve Smith
विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Virat Kohli vs Steve Smith in Test Cricket: भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे सध्या क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोन्ही फलंदाज आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम लयीत दिसले आहेत. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. चला जाणून घेऊया कसोटी क्रिकेटमध्ये कोण सर्वोत्तम आहे.

विराट आणि स्टीव्हची कसोटीतील आकडेवारी –

स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ९६ आणि विराट कोहलीने १०८ कसोटी सामने खेळले आहेत. स्मिथची कसोटी सरासरी ६० (५९.८०) च्या जवळ आहे. त्याचबरोबर कोहली ४८.९३ च्या सरासरीने धावा करत आहे. कोहलीने १८३ कसोटी डावात ८४१६ धावा केल्या आहेत, तर स्टीव्ह स्मिथने १६९ डावात ८७९२ धावा केल्या आहेत. कोहलीने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते, तर स्मिथने २०१० मध्ये कसोटी पदार्पण केले होते. कोहली कसोटीत ११ वेळा नाबाद राहिला आहे, तर २२ वेळा तो बाद झाला आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

स्मिथने आतापर्यंत ३० कसोटी शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. तसेच कोहलीने २८ कसोटी शतके आणि २८ अर्धशतके केली आहेत. स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९६१ चौकार आणि ५० षटकार मारले आहेत. त्याचबरोबर कोहलीने ९४१ चौकार आणि २४ षटकार मारले आहेत. स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे. त्याचबरोबर कोहलीची सर्वोच्च धावसंख्या २५४* धावा आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “जर टीम इंडियाची…”; रवी शास्त्रींनी भारतीय संघाच्या मानसिकतेवर उपस्थित केला प्रश्न

देशांतर्गत सामन्यांमध्ये दोघांची कामगिरी –

दोघांच्या देशांतर्गत सामन्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर स्मिथने १५८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर कोहलीने १४० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान स्मिथने २७१ डावांमध्ये ५६.१२च्या सरासरीने १३४१४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४६ शतके आणि ५८ अर्धशतके केली आहेत. तसेच कोहलीने २३१ डावात ५०.०७ च्या सरासरीने १०६६५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३५ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत.

तसेच दोघांच्या लिस्ट-एमधील कारकीर्दीबद्दल बोलायचे, तर कोहलीने ३०८ सामने खेळले आहेत. त्याचबरोबर स्मिथ १९१ सामन्यांसाठी मैदानात उतरला आहे. कोहलीने लिस्ट-ए सामन्यांमध्ये ५६.२३ च्या सरासरीने १४३४० धावा केल्या आहेत. स्मिथने ४७.६४ च्या सरासरीने ६९५६ धावा केल्या आहेत. कोहलीने यामध्ये ५० शतके आणि ७३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर स्मिथने १५ शतके आणि ४३ अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: स्टीव्ह स्मिथने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झळकावले शानदार शतक,भारताविरुद्ध खेळली विक्रमी खेळी

सध्या दोघांचा फॉर्म कसा आहे?

कोहली आणि स्मिथ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीने १८६ धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय आयपीएल २०२३ मध्ये कोहली उत्कृष्ट लयीत दिसला होता. दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात, स्मिथ पहिल्या डावात १२१ धावांची खेळी साकारली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×