Steve Smith scored a century against India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. याआधी ट्रॅव्हिस हेडने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले होते. हेडने दुसऱ्या दिवशी १५० धावांचा टप्पा पार केला. तर स्मिथने शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. हेड आणि स्मिथच्या जोडीने ओव्हलवर भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर स्मिथने २२९ चेंडूंत शतक झळकावले. या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे. स्मिथच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३५० धावांच्या जवळ पोहोचली असून या सामन्यात कांगारू संघाची स्थिती भक्कम राहिली आहे. स्मिथच्या शतकी खेळीत १७ चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्मिथने मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला - स्मिथने ३१ कसोटी शतके झळकावली आहेत. या बाबतीत रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने ४१ शतके झळकावली आहेत. स्टीव्ह वॉ ३२ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यू हेडन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ३० शतके झळकावली आहेत. सर डॉन ब्रॅडमन २९ शतकांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे खेळाडू - ४१ – रिकी पाँटिंग३२ - स्टीव्ह वॉ३१ – स्टीव्ह स्मिथ३० - मॅथ्यू हेडन२९ - सर डॉन ब्रॅडमन स्टीव्ह स्मिथने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला - स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियासाठी भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला. हे त्याचे ९वे शतक आहे. त्याने भारताविरुद्धच्या कसोटीत ८ शतके झळकावणाऱ्या रिकी पाँटिंगला मागे सोडले. त्याच वेळी, एकूणच कसोटी क्रिकेटमध्ये तो जो रूटसह भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. कसोटीत या दोन्ही फलंदाजांनी भारताविरुद्ध ९-९ शतके झळकावली आहेत. भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज - ९ - जो रूट९ – स्टीव्ह स्मिथ८ – रिकी पाँटिंग८ - सर व्हिव्ह रिचर्ड्स८ - सर गारफिल्ड सोबर्स स्मिथने स्टीव्ह वॉची बरोबरी केली - परदेशी फलंदाज म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ स्टीव्ह वॉसोबत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथचे हे इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटमधील ७ वे शतक आहे. स्टीव्ह वॉने इंग्लिश भूमीवर तेवढीच शतके झळकावली आहेत. इंग्लिश भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आहे, ज्यांनी एकूण ११ शतके झळकावली. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावणार पाहुणा फलंदाज - ११ - सर डॉन ब्रॅडमन७ - स्टीव्ह वॉ७ – स्टीव्ह स्मिथ६ – राहुल द्रविड६ - गॉर्डन ग्रीनिज