IND vs AUS Steve Smith Best Slip Catch Video: गाबा कसोटीतील चौथ्या दिवसाची सुरूवात खूपच रंजक झाली. चौथ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर जे घडलं तो चर्चेचा विषय ठरला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने केएल राहुलचा सोपा झेल सोडला. तेव्हा राहुल ३३ धावांवर खेळत होता. पण, त्यानंतर त्याने आपली धावसंख्या ८४ धावांवर नेली आणि भारताला १५० अधिक धावांचा टप्पा गाठून दिला. स्मिथने केलेल्या एका चुकीमुळे भारताला काही धावा धावफलकावर जोडता आल्या. पण स्मिथने चूक केली होती त्याची भरपाईही त्याने या सामन्यात केली. पहिल्या डावात राहुलला लायनच्या चेंडूवर झेलबाद करताना त्याचे शतक हुकण्याचे कारणही तोच ठरला.

केएल राहुल त्याच्या ९व्या कसोटी शतकापासून १६ धावा दूर असताना स्मिथने उत्कृष्ट झेल टिपत त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले. तो ८४ धावा करून बाद झाला, हे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची ९वी ५० अधिक धावंसख्या होती. गेल्या १० वर्षांत भारताकडून फक्त चेतेश्वर पुजाराने केएल राहुलपेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पन्नास अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर

केएल राहुलचा स्टीव्ह स्मिथने ब्रिस्बेनच्या मैदानावर नॅथन लियॉनच्या चेंडूवर टिपलेला झेल आणि चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या चेंडूवर त्याने सोडलेला झेल, दोन्ही जवळपास सारखेच होते. पण जो झेल त्याने सोडला तो खूपच सोपा होता. मात्र, पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर स्मिथने पुन्हा संधी मिळाल्यावर राहुलला बाद करण्यासाठी स्लिपमध्ये एक अप्रतिम झेल टिपला. स्लिपमध्ये फिल्डिंग करताना टिपलेल्या काही उत्कृष्ट झेलपैकी हा एक झेल असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा – VIDEO: गुकेशने विश्वविजेतेपदानंतर कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, भीतीवर विजय मिळवत केलं थरारक बंजी जंपिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केएल राहुलने भारताचे इतर सर्व फलंदाज जिथे फेल ठरले त्या मैदानावर सावध फलंदाजी करत भारताला १५० अधिक धावांचा टप्पा गाठून दिला. केएल राहुलने ब्रिस्बेनमध्ये खेळलेली ८४ धावांची खेळी हे ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या कसोटीच्या पहिल्या डावातील त्याच्या बॅटने झळकावलेले पहिले अर्धशतक आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियात १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या डावात राहुलचा विक्रम आणखी चांगला आहे, जे भारताच्या दृष्टिकोनातून चांगले लक्षण आहे.