Sunil Gavaskar On Ishan Kishan: भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार खेळ दाखवला. जिथे गिलने २०८ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी सिराजने ४ बळी घेतले. या सामन्यात इशान किशनने असे कृत्य केले, ज्यामुळे भारताचे माजी कर्णधार आणि महान खेळाडू सुनील गावसकर संतापले. त्याबद्दल जाणून घेऊया.

इशान किशनने केली चीटिंग

शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात किवींचे ६ फलंदाज १३१ धावांवर माघारी परतले. या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट हा वादाचा मुद्दा ठरला होता. यष्टिरक्षक टॉम लॅथम याच्या ग्लोव्ह्जने बेल्स पडूनही हार्दिकला तिसऱ्या अंपायरने त्रिफळाचीत बाद दिले होते. त्यामुळे बराच वाद सुरू आहे. टॉम लॅथम फलंदाजी करत असताना यष्टिरक्षक इशान किशनने बेल्स पाडल्या अन् अपील केले. त्याचे हे वागणे महान फलंदाज सुनील गावसकर यांना अजिबात आवडले नाही आणि त्याने राग व्यक्त केला. टॉम लॅथम क्रीजमध्ये असताना. रिप्ले पाहिल्यावर लॅथम नाबाद असल्याचे स्पष्टपणे समजले. यानंतर इशान किशन हसताना दिसला.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

सुनील गावसकर भडकले

टॉम लॅथम क्रीजच्या आत होता. त्यावेळी समालोचन करणारे माजी दिग्गज सुनील गावसकर इशान किशनने हार्दिक पांड्याला जसे बाद केले तसेच करून दाखवले आणि त्यावर अपील केल्याने भडकले होते. गावसकर म्हणाले, “बेल्स टाकणे ठीक होते, पण त्यांनी अपील करायला नको होते. त्याने जे केले ते क्रिकेट नाही. हे नियमांच्या विरोधात असून मला अजिबात आवडलेले नाही.” कुलदीप यादवने टाकलेल्या १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशानने ही अपील केली. त्यानंतर अंपायरने हिट विकेट आहे का हे पाहण्यासाठी रिप्लेचा इशारा केला. रिप्लेत बेल्स इशानने पाडल्याचे दिसले. रिप्ले सुरू असताना इशान हसत होता, परंतु समालोचन करणाऱ्या गावसकरांचा पारा चढला. मैदानावर हा सारा प्रकार सुरु असताना,“हे क्रिकेट नाही…” असे म्हणत कॉमेन्ट्री बॉक्समधून समालोचन करणाऱ्या सुनील गावसकरांना इशानने केलेला हा प्रकार फारच चुकीचा वाटला.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: शुबमन-सिराजचा जलवा! भारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी निसटता विजय, मालिकेत १-० आघाडी

भारतीय संघाने सामना जिंकला

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १२ धावांनी जिंकला. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने किवी संघाला विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून शुबमन गिलने झंझावाती २०८ धावा केल्या. त्याच्याशिवाय रोहित शर्माने ३४ धावांची खेळी केली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने गोलंदाजीत ४ बळी घेतले आहेत. त्याचवेळी कुलदीप यादवच्या खात्यात २ विकेट्स गेल्या.