भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना त्यांनी देशाचं आणि उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करणं अभिमानास्पद होतं, असं म्हटलं. “माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सुरेश रैना म्हणाला, “माझ्या देशाचं आणि उत्तर प्रदेश राज्याचं प्रतिनिधित्व करणं अभिमानास्पद होतं. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला आणि माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो.”

“या सर्वांनी माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला आणि खूप पाठिंबा दिला,” असंही सुरेश रैनाने नमूद केलं. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी सुरेश सैना १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळणार आहे.

हेही वाचा : सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”

सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी एम. एस. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एका तासात रैनानेही निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. रैना २०११ च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वातील विजेत्या संघाचा भाग होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरेश रैनाची क्रिकेट कारकीर्द

रैनाने आतापर्यंत १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो १३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला. सुरेश रैनाने २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ५,६१५ धावा काढल्या. तसेच ७८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १,६०५ धावा केल्या.