टी २० वर्ल्डकपमधल्या भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन यांनी विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सामना जिंकल्यावर पत्रकार परिषदेत येतात. मात्र पराभव झाल्यानंतर ज्युनिअर खेळाडूंना पुढे केलं जातं. गेल्या काही दिवसात असं चित्र पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री अशा प्रसंगी पाठ फिरवत असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ८ गडी राखून पराभव सहन करावा लागल्यानंतर विराट आणि रवी शास्त्री या दोघांनी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली. मात्र यावेळी जसप्रीत बुमराहला पत्रकार परिषदेला पुढे करण्यात आलं.

“प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत यायला हवं होतं. विराट कोहली पत्रकार परिषदेत येऊ इच्छित नसेल, तर हरकत नाही. पण रवी शास्त्री यांनी यायला हवं होतं. जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत येणं चुकीचं आहे. पराभवानंतर आपल्याला कारणं सांगणं गरजेचं आहे. बुमराहला पत्रकार परिषदेत पाठवणं चुकीचं आहे.”, असं माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.”एक दोन पराभवामुळे लाज वाटण्यासारख काही नाही. मात्र जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बुमराहकडून काय आशा करणार? जेव्हा विजयी होता तेव्हा पत्रकार परिषदेला सामोरं जाता. मग पराभवानंतरही पुढे आलं पाहीजे.”, असं सांगत अझरूद्दीन यांनी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना फटकारलं.

T20 WC: “इंग्लंडला फक्त दोनच संघ मात देऊ शकतात; एक पाकिस्तान आणि…”; केविन पीटरसनने व्यक्त केलं मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीने यापूर्वीच भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषकानंतर तो कर्णधार असणार नाही, असे त्याने म्हटले होते. या स्पर्धेनंतर तो खेळाडू म्हणून संघात असेल. आता अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. विराट कोहलीलाही वनडे कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही मुक्त केले जाऊ शकते. काही दिवसांनी बीसीसीआयची बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.