पर्थमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आफ्रिकन संघाला १३४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवच्या या खेळीनंतर पाकिस्तानी दिग्गजांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.
सूर्याने मागील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात २५ चेंडूत नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यानंतर त्याने पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे, या सामन्यात त्याने खास कारनामा केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६८ धावांच्या धडाकेबाज खेळीचे कौतुक करताना पाकिस्तानचा महान खेळाडू शोएब मलिक म्हणाला की “तो गोलंदाजाच्या डोक्यातील विचारांनी खेळू शकतो. गोलंदाज काय विचार करतो यावर तो फटके मारतो त्याला माहिती आहे की गोलंदाज कशाप्रकारचे चेंडू टाकणार आहेत.” इथली परिस्थिती वेगळी आहे, इथे असे शॉट्स खेळायला मन लागते. शोएबने असेही म्हटले की, “जो फटके मारतो यष्टीरक्षकाच्या मागे खेळतो. त्याचं तंत्र इतकं चांगलं आहे की त्याला बाऊन्स नाही मिळालं तरी तो मागे खेळू शकतो.”
सुर्यकुमार ३६० डिग्री फटके खेळतो
दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मिसबाह-उल-हकने सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आणि म्हटले की, “गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने जे पाहिले आहे, तो सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. मैदानाच्या सर्व बाजूंना फटके मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याचवेळी, मिसबाह व्यतिरिक्त, पाकिस्तानचा महान माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला की “सुर्यकुमार यादव इतर फलंदाजांपेक्षा काहीतरी वेगळा आहे. युवा खेळाडूंना असे फटके शिकता आले आहेत. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे