World Test Championship Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इंग्लंडच्या ओवल स्टेडियममध्ये ७ जूनपासून सुरु होणार आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा जागतिक कसोटी स्पर्धेत फायनल खेळणार आहे. आता पुन्हा एकदा टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनल खेळणार आहे. यावेळई टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असणार आहे. आख्ख्या क्रीडाविश्वाला या फायनलचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे या फायनलच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. शास्त्रीने कोहलीला डब्लूटीसी फायनलच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत शास्त्री यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शास्त्री यांनी म्हटलं, “विराट कोहलीला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल. शास्त्री गतवर्षी बर्मिंघममध्ये झालेल्या कसोटी सामन्याचं उदाहरण देत म्हणाले, माझी पसंत विराट कोहली होता. जेव्हा रोहितला दुखापत झाली, तेव्हा मला वाटलं विराटच नेतृत्व करेल. पण जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्याच कर्णधार बनवलं गेलं. त्यावेळी कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची गरज होती, असं मला वाटतं. कारण त्याच्याच नेतृत्वात आपण इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती.”

नक्की वाचा – IPL 2023 मध्ये ‘या’ फलंदाजांनी केला धमाका! गोलंदाजांचा धुव्वा उडवत ठोकलं वेगवान अर्धशतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी कोचने पुढे म्हटलं, “जर मी तिथे असतो तर नक्कीच कोहलील कॅप्टन्सी देण्याबाबत मॅनेजमेंटसोबत चर्चा केली असती. मला विश्वास आहे की राहुल (वर्तमान कोच) नेही असाच विचार केला असेल. शास्त्री कोहलीकडून करण्यात आलेल्या आरसीबीच्या कॅप्टन्सीबाबत बोलताना म्हटलं, यावेळी तो जबरदस्त कामगिरी करत आहे. खूप शांत आहे आणि अप्रतिम फॉर्म आहे. तो चांगल्या स्थितीत आहे. क्रिकेटचा आनंद घेत आहे. आता तो उत्साहाने पूर्णपणे भरलेला आहे. हे पाहून मला आनंद झाला आहे.”