Team India Border Gavaskar Trophy Performance in Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीस पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियानेही आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघातील काही खेळाडू ऑस्ट्रेलियालाही पोहोचले आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे, पण ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे आकडे काही खास नाहीत. मात्र, गेल्या दोन दौऱ्यांपासून भारतीय संघाने कामगिरीत सुधारणा केली आहे.

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे?

टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सात वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. या सात मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये एकूण २७ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या २७ पैकी फक्त ६ सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे, तर ऑस्ट्रेलियाने १४ सामने जिंकले आहेत. याशिवाय ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने या सहापैकी चार सामने गेल्या दोन दौऱ्यांमध्ये जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१२ मध्ये एकदा भारताला क्लीन स्वीप केले होते. मात्र, टीम इंडियाने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाला भारतात क्लीन स्वीप देऊन हिशोब चुकता केला होता.

मागील दोन दौरे ऐतिहासिक ठरले –

भारतीय संघाचे मागील दोन ऑस्ट्रेलियन दौरे भारतीय चाहत्यांसाठी ऐतिहासिक ठरले आहेत. खरं तर, टीम इंडियाने या गेल्या दोन दौऱ्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि या दोन्ही प्रसंगी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभवही केला आहे. भारतीय संघाने २९१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. टीम इंडियाने दोन्ही वेळा चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. यावेळीही भारतीय संघ आपली खास कामगिरी कायम ठेवेल अशी पूर्ण आशा आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ साठी दोन्ही संघ –

भाारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा – Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलिया (पहिल्या कसोटीसाठी) : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.