IND vs BAN Test Series Team India reach Chennai : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेटपटू चेन्नईला पोहोचले आहेत. १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे सराव शिबिरही येथे होणार आहे. यासाठी रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे स्टार खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत. विराट कोहली आज पहाटे ४ वाजता लंडनहून थेट चेन्नई विमानतळावर पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईत दाखल –

स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि केएल राहुल विमानतळावर टीम बसमध्ये चढताना दिसले. त्याचवेळी विराट कोहली मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत विमानतळाबाहेर येताना दिसला. बीसीसीआयने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून त्यात १६ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानवर ऐतिहासिक २-० असा विजय नोंदवल्यानंतर बांगलादेश या मालिकेत प्रवेश करेल, तर या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ४-१ ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

यावर्षी जानेवारीतील दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. मुलगा अकायच्या जन्मामुळे तो इंग्लंडविरुद्ध भारताच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता. अशा परिस्थितीत आता कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची मोठी संधी असेल. कोहलीचा यंदाचा फॉर्म काही विशेष राहिला नाही. कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्येही संघर्ष करताना दिसला होता. श्रीलंका दौऱ्यातही त्याची बॅट तळपताना दिसली नव्हती.

हेही वाचा – AFG vs NZ Test : ९१ वर्षात प्रथमच… कसोटी सामना एकही चेंडू न टाकता झाला रद्द! जाणून घ्या इतिहास

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही चेन्नईला पोहोचला आहे. रोहित विमानतळावरून बाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये कर्णधार विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिसत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

हेही वाचा – Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ : नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी मिराज, जॅकर अली अनिक, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद.