IND vs SA: दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक मालिका जिंकली. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना हा फक्त औपचारिक राहिला आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार केएल राहुलसह अनेक स्टार फलंदाजांना विश्वचषकाआधी विश्रांती देण्यात आली आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात यामुळे श्रेयस अय्यरसह अनेक खेळाडूंना संघात संधी मिळू शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी इंदौर येथे खेळला जाणार आहे. केएल राहुलसह भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांना भारतीय संघातून वगळले आले आहे. विराट हा गुवाहाटी येथून थेट मुंबईत दाखल झाला आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने तीन दिवसांची सुट्टी घेतलीय आणि तो कुटुंबियांसोबत राहणार आहे. विराटसह बीसीसीआयने आणखी एका फॉर्मात असलेल्या फलंदाजाला विश्रांती दिल्याचे वृत्त समोर येतेय. त्यामुळे इंदौर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात सुपर हिट जोडी दिसणार नाही.

हेही वाचा :   IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, श्रेयस उपकर्णधार

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी२० सामना झाल्यावर मुंबईला जाणार आहे, कारण भारत ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ६ ऑक्टोबरला मुंबईतून निघणार आहे. मागे विराटला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतही आराम दिला गेला होता यावरून चर्चांना उधान आले होते. तेव्हा त्याने बॅटला हातदेखील लावला नव्हता. नंतर त्याने आशिया चषक २०२२ मध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने जवळपास तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके केले होते. आता तो तिसऱ्या टी२० मध्ये खेळणार नाही असे रिपोर्ट्स पुढे येत असताना त्याच्याजागी कोण हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

हेही वाचा : IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. ॠषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळावी यासाठी सूर्या, विराट किंवा राहुल यांना विश्रांती दिली जाऊ शकते.