पीटीआय, नवी दिल्ली

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या लांबणीवर पडत चाललेल्या कार्यक्रमाचा आराखडा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) सोमवारी सादर करण्यात आला. या आराखडय़ानुसार भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांतील सामना १५ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच

जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्याच्या अंतिम सामन्यादरम्यान विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर होईल असे मानले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाचा आराखडाच ‘आयसीसी’कडे सादर करण्यात आला. हा आराखडा सर्व सहभागी संघांच्या क्रिकेट मंडळांकडेही पाठविण्यात आला असून, पुढील आठवडय़ात कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला झालेल्या उशिराबाबत मात्र, कुणी काही बोललेले नाही. स्पर्धेला चार महिने बाकी असताना अजून आराखडाच सादर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेचा कार्यक्रम एक वर्ष आधी जाहीर करण्यात आला होता. पाकिस्तानचा सहभाग आणि त्यांच्या सामन्यांची केंद्रे निश्चित करण्यासाठीच कार्यक्रमाला उशीर झाला असावा असे मानले जात आहे.

स्पर्धेत एकूण १० संघ खेळणार असून, आठ संघ यापूर्वीच निश्चित झाले आहेत. अन्य दोन संघ पात्रता फेरीतून निश्चित होणार आहेत. ही स्पर्धा झिम्बाब्वेला १८ जूनपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे दोन माजी विजेते वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे दोन संघ पात्रता फेरीत खेळणार आहेत.
प्रस्तावित आराखडय़ानुसार उद्घाटन आणि समारोप सोहळा अनुक्रमे ५ ऑक्टोबर आणि १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथेच होणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचे सामने १५ आणि १६ नोव्हेंबरला होणार असून, या सामन्यांची केंद्रे निश्चित झालेली नाहीत. पाकिस्तानचा सहभाग निश्चित असून, पाकिस्तानचे सामने हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि अहमदाबाद असे पाच केंद्रांवर होतील.

प्रस्तावित स्पर्धा आराखडय़ानुसार भारताचे सामने

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
  • भारत वि. अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
  • भारत वि. पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
  • भारत वि. बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे</li>
  • भारत वि. न्यूझीलंड २२ ऑक्टोबर, धरमशाला
  • भारत वि. इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनऊ
  • भारत वि.पात्रता फेरीतील संघ, २ नोव्हेंबर, मुंबई</li>
  • भारत वि. दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
  • भारत वि. पात्रता फेरीतील संघ, ११ नोव्हेंबर, बंगळूरु