भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सात गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ७३ धावांनी पराभूत झाला. यासह भारताने ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ५६ धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने ५१ धावा केल्या. यासह अक्षर पटेलने सुरुवातीलाच धक्के देत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले होते.

दीपक चहरला अनेक वेळा गोलंदाजीत चमत्कार केले आहेत, पण क्वचितच फलंदाजीमध्ये जोरदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. रविवारी ईडन गार्डन्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चहरने आठ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली आणि यादरम्यान ९५ मीटर लांब षटकारही मारला, ज्याला पाहून कर्णधार रोहित शर्माने स्वत:ला सलाम केला. दीपकच्या या षटकारावर रोहितची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करून भारताने चाहत्यांच्या टी २० विश्वचषकातील पराभवाच्या जखमा भरून काढल्या आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अ‍ॅ डम मिल्नेच्या शेवटच्या षटकात दीपक चहरने दोन चौकार आणि एका षटकारासह एकूण १९ धावा केल्या, ज्याच्या जोरावर भारताने २० षटकात सात बाद १८४ धावा केल्या. १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १७.२ षटकांत १११ धावांवर गारद झाला. कर्णधार म्हणून, रोहित शर्माने आपल्या पहिल्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत क्लीन स्वीप केले. रोहित संपूर्ण मालिकेत चमकदार फॉर्ममध्ये दिसला आणि म्हणूनच त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८-० न्यूझीलंडविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची ही भारताची सलग दुसरी वेळ ठरली. मागील वर्षी भारताने न्यूझीलंडमध्ये झालेली पाच सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकली होती. त्यानंतर आता भारताने पुन्हा ३-० असे निर्भेळ यश मिळवले.