टीम इंडिया सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात २४ फेब्रुवारीपासून तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठीचा संघ लवकरच जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला टी-२० मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. विराट कसोटी मालिका खेळणार आहे. विराटने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना विराटचा १००वा कसोटी सामना ठरणार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला असून श्रीलंका मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो. क्रिकबझच्या बातमीनुसार, रवींद्र जडेजा लखनऊला पोहोचला आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना येथे होणार आहे. तो सध्या क्वारंटाइन आहे. कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तो संघात सामील होईल.
हेही वाचा – IPL 2022 : मेगा ऑक्शननंतर सनरायझर्स हैदराबादला ‘मोठा’ धक्का; आता काय करणार काव्या मारन?
जडेजाने नोव्हेंबर २०२१ पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही पुनरागमन करू शकतो. तो वेस्ट इंडीज मालिकेत खेळत नाहीये. संघाने वेस्ट इंडीजविरुद्धची वनडे मालिका ३-० अशी जिंकली. टी-२० मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.