Coronavirus lockdown : लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL च्या आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप करोनाचा फैलाव आणि प्रार्दुभाव कमी होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाचे IPL अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. माजी खेळाडू मदन लाल यांनी प्रेक्षक नसलेल्या मैदानांवर IPL चे सामने खेळवण्यात काहीच अर्थ नाही, असे मत व्यक्त केले होते. काहीसे तशाच आशयाचे मत आता भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.

क्रीडाक्षेत्रात खळबळ! दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूला Coronavirus ची लागण

जगभरातील बहुतांश क्रिकेट खेळणारे देश प्रेक्षकांविना क्रिकेट सामने आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षी होणारी टी २० विश्वचषक स्पर्धा देखील आता प्रेक्षकांविना खेळण्यात येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विराटने आपले मत व्यक्त केले आहे. भारतातील एका क्रीडा वाहिनीला विराटने मुलाखत दिली.

“IPL वर अनेकांचे EMI अन् संसार अवलंबून आहेत, त्याचं काय?”

“प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळवले जाण्याची शक्यता सध्या तरी नाकारता येत नाही. पण त्याबाबत प्रत्येकाला काय वाटेल ते माहिती नाही. कारण आतापर्यंत आम्ही भरपूर प्रेक्षक असलेल्या स्टेडियममध्येच सामने खेळलो आहोत. सामने खेळताना खेळाडू नक्कीच आधीसारखे पूर्ण शक्तीनिशी खेळतील यात शंका नाही. पण खेळाडूंचे स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांशी जे नाते तयार होते, ते कुठेतरी हरवून जाईल. सामना जसा जसा पुढे जातो तसा तसा स्टेडियममध्येही एक वातावरण तयार होते. ते प्रेक्षक नसलेल्या सामन्यात दिसून येणार नाही. इतकंच नाही तर प्रेक्षकांचा पाठिंबा असल्यामुळे काही वेळा खेळाडू मैदानावर विविध पद्धतीने व्यक्त होतात, तसं व्यक्त होणं देखील हरवून जाण्याची शक्यता आहे”, असं विराट क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात म्हणाला.

And it’s a SIX … युवराजने शेअर केला खास VIDEO

सामने आणि क्रिकेट चालूच राहील पण प्रेक्षकांमुळे स्टेडियममध्ये जी जाग असते, जो उत्साह असतो तो मात्र हरवून जाईल, असेही मत कोहलीने व्यक्त केले.