Ravindra Jadeja on Virat Kohli’s Catch: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव करत मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज अक्षरशः ढेपाळले. दोघांनी मिळून विंडीजच्या तब्बल ७ फलंदाजांना तंबूत माघारी धाडले. विजयानंतर जडेजाने कुलदीपची मुलाखत घेतली आहे. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कुलदीपने जडेजाला एक प्रश्न विचारला की, “विराट कोहलीचा झेल पाहून तुला काय वाटले?” यावर रवींद्र जडेजाने कोहलीची स्तुती करताना त्याच्या फिटनेसचे कौतुक केले. वेस्ट इंडिजच्या डावातील १८व्या षटकात विराट कोहलीने शानदार क्षेत्ररक्षण केले. जडेजाने वेस्ट इंडिजचा फलंदाज रोमॅरियो शेफर्डला बाद केले. शेफर्डच्या बॅटची कड घेत चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या उजव्या बाजूला गेला, जो विराट कोहलीने डायव्ह केला आणि एका हाताने झेल घेतला. क्रिकेटच्या वर्तुळात या झेलचे कौतुक होत आहे.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा डाव ११४ धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाजांनीही चांगली सुरुवात केली, पण जडेजाने गोलंदाजीची धुरा सांभाळताच वेस्ट इंडीजचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. यानंतर कुलदीप यादवनेही विंडीजच्या फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या तालावर नाचवले. जडेजा इतकेच कोहलीनेही रोमॅरियो शेफर्डच्या विकेटमध्ये योगदान दिले. कोहलीने स्लिपमध्ये एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल सोपा नव्हता, म्हणूनच जडेजाने त्या झेलसाठी कोहलीची स्तुती करताना ‘अप्रतिम, अवर्णनीय’ असे म्हटले.

कोहलीला फार कमी वेळ होता – रवींद्र जडेजा

सामन्यानंतरच्या मुलाखतीत कुलदीप यादवने रवींद्र जडेजाला कोहलीने घेतलेल्या झेलबद्दल विचारले. तो म्हणाला, “तू जवळ होतास, गोलंदाजी करत होतास, मग कोहलीचा झेल तुला कसा वाटला? जडेजा तू अनेक वेळा अशा प्रकारचे झेल पकडले आहेत. तुझ्या गोलंदाजीत विराटने अशाच प्रकाराचा झेल पकडला आहे. त्यावर तुला कसे वाटले?”

हेही वाचा: IND vs WI: रोहित शर्माला आठवले जुने दिवस, १२ वर्षांपूर्वीच्या स्टाईलमध्ये हिटमॅनने मैदानात मारली एन्ट्री; म्हणाला, “मी २०११ साली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर अष्टपैलू रवींद्र जडेजा म्हणाला, “मला खूप छान वाटले, प्रत्येक वेळी मी दुसऱ्याच्या गोलंदाजीवर झेल घेतला पण आज माझ्या चेंडूवर कोणतरी असा झेल पकडला असल्याने मला खूप आनंद झाला. हा झेल खरोखरच अवर्णनीय, अप्रतिम होता. स्लिपमध्ये चेंडू खूप वेगाने आला, फलंदाजाने कडक शॉट मारला होता. चेंडूही खाली जात होता. तो एक लो आणि शार्प कॅच होता. चेंडू एका सेकंदात त्याच्यापर्यंत पोहोचला आणि कोहलीने तो अप्रतिमरित्या पकडला. शुबमननेही चांगला झेल घेतला, चेंडू तिथेही खाली होता. अशा क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाजांचे मनोबल वाढते.”