scorecardresearch

IND vs WI : पहिल्या टी-२० मॅचपूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘स्टार’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

१६ फेब्रुवारीला कोलकाता येथे पहिला टी-२० सामना खेळवला जाईल.

Washington Sundar ruled out of the T20I series due to hamstring injury
वॉशिंग्टन सुंदरला दुखापत

१६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फिरकीपटू वॉ़शिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सुंदर सामने खेळू शकणार नाही. बायो बबल प्रोटोकॉलमुळे बीसीसीआय बदली खेळाडू देऊ शकत नसल्याचे वृत्त आहे.

यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Washington sundar ruled out of the t20i series due to hamstring injury adn

ताज्या बातम्या