Vikram Rathod on Shubaman Gill: फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिलने भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये सलामीवीराची भूमिका बजावल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्रमांक ३ वर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या क्रमांकावर तो काही विशेष करू शकला नाही आणि केवळ ८ धावा करून बाद झाला. परंतु केवळ एका डावात फ्लॉप होऊन त्याच्या प्रतिभेवर कोणीही प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. वेस्ट इंडिज मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराची संघातून हकालपट्टी केल्यानंतर नव्या खेळाडूला ही जबाबदारी दिली जाईल, अशी अपेक्षा होती पण शुबमन गिलने ही जबाबदारी स्वीकारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

शुबमन गिल पहिल्या कसोटीत जर तिसऱ्या क्रमांकावर खेळला नसता तर पुजाराच्या फलंदाजीची जबाबदारी यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड यांच्याकडे दिली असती. मात्र, आघाडीचा फलंदाज गिलने आपल्या नवीन क्रमांकावर फलंदाजीची भूमिका बजावू शकला नाही. त्याने ११ चेंडूत केवळ ६ धावा केल्या. त्याचवेळी सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणात आपले पहिले शतक झळकावत अनेक विक्रम मोडले. पहिल्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजवर मोठ्या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना, भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौड यांनी सुपरस्टार गिलला आपला पाठिंबा दिला आहे. राठोड म्हणाले की, “शुबमनने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा प्रस्ताव संघाकडे आणला होता.”

हेही वाचा: Wimbledon 2023: अल्कराझच्या खेळीवर क्रिकेटचा देव झाला फॅन, पहिले विम्बल्डन जिंकणाऱ्या कार्लोसला दिल्या खास शुभेच्छा

पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम राठौड म्हणाले, “तीन सलामीवीरांना एकाच सामन्यात खेळायचे होते. त्यामुळे एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागणार होते. शुबमनने स्वतः संघाला ऑफर दिली की तो या क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. कारण, त्याने आतापर्यतचे सर्व क्रिकेट हे पंजाब आणि भारत ‘अ’कडून खेळले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ किंवा ४ क्रमांकावर खेळला आहे आणि हाच त्याचा दीर्घ स्वरूपातील फलंदाजीचा खरा स्लॉट आहे.”

पुढे बोलताना राठौड यांनी शुबमनला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, “आम्ही त्याच्यावर एका डावातील खराब कामगिरीच्या आधारे न्याय देऊ शकत नाही. त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. शुबमनचे खेळण्याचे तंत्र आणि स्वभाव हा वेगळा असून जेव्हा गरज असेल तेव्हा आक्रमक फटके किंवा डाव सावरण्याचे काम तो करू शकतो. त्याच्यात तेवढी क्षमता असल्याने त्याने हा निर्णय घेतला आणि तो आम्ही मान्य केला. भारताला पुढे नेण्यासाठी आम्हाला अशाच तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूची गरज आहे कारण, ती टीम इंडियाला फायदेशीर ठरू शकते. कधी कधी तुम्हाला संघासाठी असे निर्णय घ्यावे लागतात.”

हेही वाचा: Wimbledon 2023: विम्बल्डन फायनलमध्ये जोकोव्हिचविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर राफेल नदालने कार्लोस अल्कराझचे केले कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली पण चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गिलची सुरुवात चांगली झाली नाही. भारताच्या एकमेव डावात तो केवळ ६ धावांवर बाद झाला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि नवोदित यशस्वी जैस्वाल यांनी शतके झळकावली आणि विराट कोहलीने ७६ धावांचे योगदान दिले.