T20 World Cup 2024, Sunil Gavaskar on Virat and Rohit: विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये परतले आहेत. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की या दोघांचीही टी-२० विश्वचषक संघात निवड होणार का? मात्र, आयपीएलमधील भारतीय खेळाडूंच्या फॉर्मवरून टी-२० विश्वचषकाचा संघ निश्चित होईल, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यावर सहमत नाहीत. या दोन दिग्गजांच्या संघ निवडीबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

भारताचा माजी कर्णधार कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा आहे, तर युवा यशस्वी जैस्वाल मोहालीत कर्णधार रोहितबरोबर डावाची सुरुवात करेल. वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यासाठी अनुपलब्ध असलेला कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये परतणार आहे. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताच्या अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये कोहलीला त्याची निवड योग्य आहे हे सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. त्याच्या निवडीच्या प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू असताना संघातील स्थान अधिक मजबूत करण्यासाठी, कोहलीला फक्त दोन सामने खेळायला मिळणार आहेत.

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: आवेश खानची कविता अन् मोहालीच्या थंडीची राहुल द्रविडने केली बंगळुरूशी तुलना, पाहा मजेशीर Video

रोहित आणि कोहलीच्या वरिष्ठ फलंदाजांच्या पुनरागमनाबद्दल बोलताना महान फलंदाज गावसकर यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सरासरी कामगिरी करूनही वरिष्ठ फलंदाजांची संघात निवड करावी, असा सल्ला दिला. ते म्हणाले, “मला वाटते की आयपीएलचा फॉर्म महत्त्वाचा असेल कारण, विश्वचषकापूर्वी हा सध्याचा फॉर्म पुढे नेता येईल. अफगाणिस्तान मालिका जानेवारीत आहे, तर विश्वचषक जूनमध्ये आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ज्याचा फॉर्म चांगला असेल त्याला प्रथम महत्त्व द्यावे. त्याच्या कामगिरीचा विचार व्हायला हवा.”

लिटिल मास्टर गावसकर पुढे म्हणाले, “विराट-रोहित जर आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करू शकले तरच त्यांना संघात स्थान द्यावे. याबरोबरच मी हेही म्हणेन की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आयपीएल सरासरी जरी चांगली असली तरी त्यांनी तिथे धावा कराव्यात. तुम्ही प्रत्येक सामन्यात धावा करू शकत नाही, किमान त्यांनी १४ पैकी ५ सामन्यांमध्ये धावा करायला हव्यात. जर त्यांनी या सामन्यांमध्ये चांगले योगदान दिले तर तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल आणि तुम्ही त्यांची संघात निवड करू शकता. रोहित शर्मा आणि विराट कोहली जर डगआउटमध्ये असतील तर संघाचा आत्मविश्वास कुठे असेल याची कल्पना करा. त्यांची उपस्थिती भारतीय संघासाठी महत्वाची आहे.”

हेही वाचा: हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंना घडलाय तुरुंगवास

तत्पूर्वी, भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल. टी-२० विश्वचषक यंदा जूनमध्ये होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची मालिका असेल. पहिला सामना पीसीए स्टेडियम, मोहाली येथे होणार आहे.