India vs England, Full Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. रोहित पर्व संपल्यानंतर आता शुबमन पर्व सुरू होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा होण्याआधीज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. २० जूनपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेमध्ये रंगणार आहे. ही आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ साखळीतील भारतीय संघाची पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयाने सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारत -इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल संपूर्ण माहिती

सामन्याची वेळ – दुपारी ३:३० वाजता
कुठे लाईव्ह पाहता येणार? -सोनी स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन ५
ऑनलाईन कुठे पाहता येणार? – जियो सिनेमा, डिस्नी प्लस हॉटस्टार

इंग्लंडने मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी जाहीर केलेला संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्राडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप,जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>

असं आहे या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन

नवा कर्णधार, नवा जोश

भारतीय संघ बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण संघाचं नेतृत्व करत असताना त्याला फलंदाजीतही योगदान द्यावं लागणार आहे. तसेच केएल राहुल डावाची सुरूवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल या संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ मायदेशात आपला विजयीरथ पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.