बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार द्विशतक झळकावून इशान किशनने एक नवीन खळबळ माजवली आहे. किशन हा आधीच आक्रमक फलंदाज आहे, पण शनिवारी जे घडले ते पाहून पुन्हा त्यावर शिक्कामोर्तंब झाला. किशनने ज्या पद्धतीने धावा केल्या त्यामुळे ही इनिंग खास बनली आहे. आता किशनच्या बालपणीच्या प्रशिक्षकाचीही मुलाखत घेतली जात आहे.
किशनने सलामीला येताना १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांची बरसतात करत २१० धावांची खेळी केली. किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा (१२६ चेंडू) विक्रम आपल्या नावे केला. त्याला कोहलीची उत्तम साथ लाभली. डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या १८२ धावांवर तंबूत परतला.
खेळणे किशनच्या नशिबी नव्हते –
भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकल्यावर लक्षात येते की, किशनला संधी मिळने कठिन होत.कारण रोहित-धवन ओपनिंग करत असल्यामुळे किशन एकदिवसीय मालिकेत खेळणे निश्चित नव्हते. तिसऱ्या सामन्यात कर्णधाराची दुखापत किशनसाठी वरदान ठरली आणि त्याने हे सिद्ध केले की तो आता धवनचा चांगला बदली खेळाडू आहे. सध्या धवन खराब फॉर्ममधून जात आहे.
पण एकदिवसीय विश्वचषकात किशनचे स्थान आता पक्के झाले आहे असे कोणी म्हणू शकेल का? टीम मॅनेजमेंटने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसला तरी पत्रकारांनी किशनला प्रश्न विचारला असता त्याने मजेशीर उत्तर दिले आहे. त्याच्या या उत्तराने आजूबाजूचे लोक खळखळून हसले. तो म्हणाला, ”मला माहित नाही, मी या गोष्टींचा वाटत नाहीत. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी फक्त कामगिरी करू शकतो. मला बोलायचे नाही कारण बॅटला बोलू द्या. माझ्यासाठी जागा आहे की नाही? आता २०० केल्या आहेत, मग काय माहित (चान्स मिळाल्यास).”
भारताकडे शुबमन गिलच्या रूपाने आधीच दुसरा सलामीवीर आहे. ज्यामुळे इशानला माहित आहे की स्पर्धा कठीण आहे. त्यामुळे त्याला इतर क्रमांकावर देखील फलंदाजीसाठी यावे लागेल. किशन म्हणाला, ”मला वाटतं बाकीच्या खेळाडूंनाही इतर कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आहे. एक युवा खेळाडू असल्याने मला त्याच क्रमांकावर फलंदाजी दिली जावी, असे मी म्हणू शकत नाही. तुम्हाला मिळणाऱ्या संधींचा फायदा करून घेणे जमले पाहिजे. अशा प्रकारे महान खेळाडू तयार होतात.”