भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. या दोन्ही संघांमध्ये काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यात पुजारा हे सर्वात मोठे नाव आहे. पुजाराचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून चांगला नाही. कौंटी क्रिकेटमध्ये तो धावा करत आहे, पण टीम इंडियासाठी त्याच्या बॅटमधून फारशा धावा निघालेल्या नाहीत. अशा स्थितीत निवड समितीने त्याला पुन्हा एकदा संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशा स्थितीत पुजारा पुन्हा संघाबाहेर असताना क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या की आता टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात त्याचे स्थान निश्चित केल्यानंतर, पुजाराला २०१४-१५ बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये प्रथमच वगळण्यात आले. एक वर्षानंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. त्यावेळी कोहलीने पुजाराच्या स्ट्राईक रेटवर टीका केली. २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या सामन्यात पुजाराच्या जागी के.एल. राहुलला संधी देण्यात आली होती.

यानंतर पुजाराने पुनरागमन करत काही वर्षे दमदार कामगिरी केली. चौथ्यांदा पुजारा आणि रहाणे या दोघांनी संघातील स्थान गमावले. मात्र, कौंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत त्याने पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले. मात्र या संधीचा फायदा पुजाराला करता आला नाही. बांगलादेशविरुद्ध ९० आणि १०२ धावांची खेळी वगळता गेल्या तीन वर्षांत त्याने २६च्या खराब सरासरीने धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: वेस्ट इंडिज दौऱ्यावर निवड झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल झाला व्यक्त; म्हणाला, “वडिलांना अश्रू अनावर पण मी…”

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया मालिकेत अपयशी ठरल्यानंतर त्याच्यासाठी फार कमी संधी उरल्या होत्या, परंतु निवडकर्त्यांना WTC फायनलपूर्वी बदल करायचे नव्हते.” ओव्हलवरील त्याच्या कामगिरीवरून हे सिद्ध झाले की आता त्याला संघात फार कमी संधी मिळतील. एस.एस. दास WTC फायनलसाठी लंडनमध्ये होते. त्यांनी आपले मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलून त्यांना सांगितले असावे आणि फायनलनंतरच्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची माहिती दिली.”

बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, “WTC हे दोन वर्ष चालणारी मालिका आहे आणि पुजाराने तीन वर्षांपासून धावा केल्या नाहीत. विराट कोहली आणि पुजारा यांच्यात फक्त लयीचा फरक आहे. होय, कोहलीचाही एक वाईट टप्पा होता पण तो कधीच फॉर्मबाहेर दिसला नाही.” ते पुढे म्हणाले, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुजाराच्या लयीत फार बदल झाले आहेत. पॅशन हा देखील एक मुद्दा होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या या दोन डावांना फारसे महत्त्व राहिले नाही.”

हेही वाचा: James Anderson: एजबॅस्टनच्या खेळपट्टीवरून अँडरसनचा एसीबीला इशारा; म्हणाला, “अ‍ॅशेसमध्ये अशीच खेळपट्टी राहिल्यास लवकरच मी…”

जेव्हा चेतेश्वर पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी निवडण्यात आले होते तेव्हा माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाले होते की, “या दोन्ही फलंदाजांना पुनरागमन करण्यासाठी दार बंद झालेली नाहीत. त्यांना जर टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why cheteshwar pujara was discharged even after performing like virat kohli big disclosure of bcci formula avw
First published on: 24-06-2023 at 18:00 IST