IPL Teams: इंडियन प्रीमियर लीगचा १७वा हंगाम म्हणजेच आयपीएल २०२४ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या १७ वर्षांच्या आयपीएलच्या इतिहासात अनेक संघ आहेत, काही संघांनी चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. पण त्यापैकी काही संघांनी लवकरच आपला गाशा गुंडाळला तर तर अशाच काही निकाली निघालेल्या संघांबद्दल आपण जाणून घेऊया.

– quiz

Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस
west bengal teacher recruitment scam in marathi
विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

१.डेक्कन चार्जर्स (२००८ ते २०१२)
२००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आठ संघांपैकी एक संघ होता, डेक्कन चार्जर्स. पहिल्याच सत्रातील खराब कामगिरीनंतर या संघाने २००९ मध्ये विजेतेपद पटकावले.दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या या आयपीएलमध्ये अॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्त्वाखालील संघाने जेतेपद पटकावले. रोहित शर्मा हा त्या संघाचा कर्णधार होता. अॅडम गिलख्रिस्ट, अँड्यू सायमंड्स, हर्षेल गिब्स, शाहिद आफ्रिदी, चामिंडा वास असे दिग्गज खेळाडू या संघाचा भाग होते.

डेक्कन क्रोनिकल या कंपनीने १० कोटी ७० लाख रूपयांना दहा वर्षांसाठी संघाची मालकी मिळवली होती. २००९ च्या आयपीएल जेतेपदानंतर २०१० मध्ये संघाने बाद फेरी गाठली. २०११ मध्ये कुमार संगकारा संघाचा कर्णधार होता, त्यावर्षी डेक्कन संघ सातव्या स्थानावर राहिला. तर २०१२ मध्ये अधिक घसरण होत आठव्या स्थानी त्यांना समाधान मानावे लागले. १४ सप्टेंबर २०१२ मध्ये आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याने संघावर कायमची बंदी घातली.

बेकायदेशीर पध्दतीने बीसीसीआयने संघ बरखास्त केल्याचा दावा करत डेक्कन क्रोनिकलने BCCI विरुद्ध याचिका दाखल केली. आठ वर्षांनंतर जुलै २०२० मध्ये न्यायालयाने डेक्कन संघाच्या बाजूने निर्णय दिला आणि नुकसान भरपाई म्हणून बीसीसीआयने डेक्कन क्रोनिकल कंपनीला ४८०० कोटी रुपये द्यावेत, असे सांगितले.

यानंतर सन टीवी ग्रुपने मालकी मिळवत संघाचे नाव सनरायजर्स हैदराबाद असे ठेवले आणि नव्याने संघबांधणी केली.

२. कोची टस्कर्स केरळा (२०११)
आयपीएलचा केवळ एकच सीझन खेळलेला संघ म्हणजे कोची टस्कर्स केरळा. कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कर्न्झोटियमने १५३३ कोटी रूपयांना संघाची मालकी मिळवली. केरळच्या सहमालकांमध्ये रवींद्र आणि शैलेंद्र गायकवाड यांच्यासह खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा समावेश होता. सुरूवातीला संघाचं नाव इंडी कमांडोज केरळा होतं पण नंतर ते बदलण्यात आलं.

दिग्गज आणि विस्फोटक फलंदाज महेला जयवर्धने कोची संघाचा कर्णधार होता तर वीवीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन, ब्रेंडन मॅक्युलम, ब्रॅड हॉज आणि जडेजासारखे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू होते पण पहिल्याच हंगामात संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी होते.

संघ मालकांमधील वादामुळे २०११चा हंगाम सुरू होण्यापूर्वी फ्रँचायझी फीच्या १० टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून ठेवण्यात फ्रेंचायझी अयशस्वी ठरली. बीसीसीआयने दावा केला की त्यांनी फ्रँचायझी मालकांना पेमेंटसाठी वारंवार सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. १९ सप्टेंबर २०११ रोजी, तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी घोषणा केली की फ्रँचायझी बँक गॅरंटी रक्कम भरण्यात अयशस्वी ठरवली त्यामुळे संघाला निकाली काढण्यात आले. २०१२ च्या लिलावात कोची संघातील खेळाडूंना सामील करून घेतलं.

संघ बरखास्त केल्याने कोची संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयविरूध्द न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर २०१५ मध्ये या संघाच्या बाजूने निकाल लागल्याने न्यायाधीश लाहोटी यांनी नुकसान भरपाई म्हणून ५५० कोटी रूपये बीसीसीआयने देण्याचे आदेश दिले.

३. पुणे वॉरियर्स(२०११ ते २०१३)
कोची संघासोबतच पुणे वॉरियर्स संघालाही २०११ मध्ये आयपीएलमध्ये सामील केले.सहारा ग्रुप स्पोर्ट्स लिमिटेड कंपनीला संघाची मालकी मिळाली. पारंपारिक वेशातील म्हणजेच साडी घातलेल्या चीयरलीडर्स सहाराने आणल्या होत्या.

भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग या संघाचा कर्णधार होता. पहिल्याच हंगामानंतर युवराजला कॅन्सरचे निदान झाले. २०१३ मध्ये त्याने पुन्हा संघात पुनरागमन केले. सौरव गांगुलीने सुध्दा या संघाचे कर्णधारपद भूषवले. २०१३ मध्ये गांगुलीने निवृत्त झाल्याने अँजेलो मॅथ्यूजने संघाचे नेतृत्त्व केले. रॉबिन उथप्पा, जेसी रायडर, ग्रॅमी स्मिथ, जेरोम टेलर, स्टीव्हन स्मिथ, मार्लन सॅम्युअल्स, ल्यूक राईट अशा खेळाडूंनी सजलेला हा संघ होता.

२०१२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी सहारा आणि बीसीसीआय यांच्यात आर्थिक वाद पेटला, या वादानंतरच पुणे संघ आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. फ्रँचाइजी शुल्क आणि युवराज सिंगऐवजी बदली खेळाडू ही या वादाची कारणं होती. हंगामातली आपला अखेरचा सामना खेळत सहाराने बीसीसीआयविरुद्धच्या वादामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

रायझिंग पुणे सुपरजायंट्स (२०१६,२०१७)
मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे आयपीएलमधील प्रसिध्द संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघावर दोन वर्षांची बंदी घातली. रायझिंग पुणे सुपरजायंट्स म्हणजेच चेन्नईचाच संघ होता. या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर कोच स्टीफन फ्लेमिंग होते.धोनीसह संघात फॅफ डू प्लेसिस, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, स्टीव्हन स्मिथ असे खेळाडू होते. २०१६ मध्ये पुणे संघाला बाद फेरी गाठता आली नाही.

२०१७ मध्ये स्टीव्हन स्मिथकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले, यावरूनही वाद निर्माण झाला. पण या हंगामात शानदार कामगिरी करत थेट फायनल गाठली पण मुंबई इंडियन्स संघाने त्यांना एका धावेने नमवले आणि जेतेपद पटकावले. चेन्नई संघावरील बंदीची कारवाई पूर्ण होताच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा प्रवास २०१७ मध्ये थांबला.

गुजरात लायन्स (२०१६,२०१७)


मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे चेन्नईसोबत बंदी घातलेला दुसरा संघ होता, राजस्थान रॉयल्स. या संघाची जागा गुजरात लायन्सने घेतली. इंटेक्स टेक्नॉलॉजी कंपनीने या संघाची मालकी मिळवली.सुरेश रैना या संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या ताफ्यात ब्रेंडन मॅकक्युलम, आरोन फिंच, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, अँड्यू टाय असे दिग्गज खेळाडू होते. पहिल्याच हंगामात या शिलेदारांनी बाद फेरी गाठली, मात्र क्वालिफायर सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या हंगामात गुजराततर्फे खेळणाऱ्या अँड्यू टायने हॅट्ट्रिक घेतली तर सुरेश रैनाच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. तरीही संघाने त्या हंगामाचा शेवट सातव्या स्थानी राहून केला. चेन्नईप्रमाणेच राजस्थान संघावरील बंदीची कारवाई पूर्ण होताच गुजरात लायन्स संघाचा प्रवास २०१७ मध्ये थांबला.