Suryakumar Yadav On Harshit Rana: आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला टी – २० संघात स्थान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केले होता. मात्र, या संघात त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. ज्यात श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराजसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान केवळ १ टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या हर्षित राणाला या संघात स्थान दिलं गेलं आहे. दरम्यान त्याला संघात स्थान देण्याचं नेमकं कारण काय? कर्णधार सूर्यकुमार यादवने यामागचं कारण सांगितलं आहे.

हर्षित राणाला केवळ १ टी -२० सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. हर्षितला संघात स्थान मिळाल्यानंतर अनेकांनी या निर्णयावर टीका केली. पण सूर्यकुमार यादवने या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्याच्या मते, या संघात हर्षित राणाची निवड करणं हा योग्य निर्णय आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

हर्षित राणाबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “ हर्षितने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मला वाटतं तो पुण्यात पार पडलेल्या सामन्यात कन्कक्शन सब्स्टिट्यूट म्हणून आला होता. भारतासाठी खेळताना त्याने शेवटच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आम्हाला त्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. तो चांगली कामगिरी करू शकतो.”

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आलेला नाही. वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदिप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हर्षित राणाला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

आगामी आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग