यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताने पाकिस्तानविरोधातील सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी धडाकेबाज खेळी करत संघासाठी विजय खेचून आणला. दरम्यान, या जोडीच्या कामगिरीनंतर आयपीएलमधील गुजरात टायटन्स या फ्रेंचायझीने केलेल्या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या ट्वीटचा संदर्भ देत रवींद्र जडेजा आयपीएलचा आगामी हंगाम गुजरात टायटन्स संघाकडून खेळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा >>> केएल राहुलच्या जागेवर ऋषभ पंत? की दीपक हुडाला मिळणार संधी; हाँगकाँगविरोधात ‘अशी’ असेल टीम इंडिया

जडेजा-पंड्या या जोडीने केलेल्या शानदार कामगिरीमुळेच भारताला विजय मिळाला. दरम्यान आयपीएलमधील संघ गुजरात टायटन्सने दोघांचा एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी “ढोकळा, फाफडा, खाकरा; हार्दिक-जड्डू आपला,” असे कॅप्शन दिले आहे. गुजरात टायटन्स संघाने रवींद्र जडेजाला ‘आपला’ म्हटल्यामुळे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> भारताचा ‘हुकुमी एक्का’ परतणार का? दुखापतीतून सावरणाऱ्या बुमराहबद्दल BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

पाकिस्तानविरोधातील सामन्यात हार्दिक पंड्या-रवींद्र जडेजा या जोडीने चौकार षटकार लगावत नेत्रदीपक कामगिरी केली. या सामन्यात पंड्याने नाबाद ३३ धावा केल्या, तर जडेजाने २९ चेंडूंमध्ये ३५ धावा करत संघासाठी विजयाचा मार्ग सुकर केला. विशेष म्हणेज पहिल्या फळीतील खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर जडेजा आणि पंड्या या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. दोघांनी मिळून २९ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या.

हेही वाचा >>> “हार्दिक पंड्या मैदानात म्हणजे भारताकडे १२ खेळाडू,” ३ देशांच्या संघांना प्रशिक्षण दिलेल्या माजी खेळाडूने केले तोंडभरून कौतूक

रवींद्र जडेजा मागील हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला. मात्र दुखापतीमुळे त्याला हा हंगाम अर्ध्यातच सोडावा लागला. त्याच्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर पुन्हा ते परत महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आले. याच कारणामुळे जडेजा चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनावर नाराज असल्याचेही म्हटले जाते. असे असताना गुजरात टायटन्सने रवींद्र जडेजाला आपला म्हटल्यामुळे तर्कविर्क लावले जात आहेत.