भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग हा माझ्यासाठीही प्रेरणादायक असून त्याच्याकडून हॉकीतील बऱ्याच काही गोष्टी शिकता येतील. मी देखील त्याच्याकडून चांगली शैली शिकण्याचा विचार करीत आहे असे पाकिस्तानचा खेळाडू महंमद रिझवान याने सांगितले.
रिझवान व सरदारासिंग हे आगामी हॉकी लीगमध्ये दिल्ली वेव्हरायडर्सकडून खेळणार आहे. रिझवान म्हणाला, सरदारासिंग हा जगातील अत्यंत अव्वल दर्जाचा आक्रमक खेळाडू आहे. त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळणे हा माझा बहुमानच आहे. सरदारासिंग याच्याकडून आक्रमक खेळ करण्याच्या शैली मी शिकणार आहे.