India W vs Australia W 3rd T20: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकूनही २-१ असा पराभव पत्करावा लागला. संघाच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या वक्तव्यात दोन प्रमुख उणीवा अधोरेखित केल्या आहेत. त्या उणिवांवर आता जास्तीत जास्त लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने १४७ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियन महिला संघाने १८.४ षटकात केवळ ३ गडी गमावून केला होता. तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांपैकी भारतीय महिला संघ फक्त एकच सामना जिंकू शकला आणि ५ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

संघाला फिटनेस आणि क्षेत्ररक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज

ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाकडून अत्यंत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. याशिवाय अनेक खेळाडूंचा फिटनेसही अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही. या सगळ्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर सांगितले की, “आम्ही कसोटीत चांगली कामगिरी केली होती पण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ आमच्यापेक्षा खूपच चांगला खेळला.”

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

हरमन पुढे म्हणाली, “कसोटीमध्ये आम्हाला माहित होते की आमच्याकडे रणनीती आणि विश्लेषण करण्यासाठी वेळ आहे, परंतु एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आम्हाला त्यासाठी आगाऊ तयारी करावी लागेल. आम्ही आता या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देणार आहोत, याशिवाय फिटनेस आणि क्षेत्ररक्षण हाही संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या टी-२०मध्ये आमचे क्षेत्ररक्षण खूपच चांगले होते आणि त्यामुळे आम्ही त्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो पण उर्वरित दोन सामन्यांमध्ये आम्ही त्या पातळीवर क्षेत्ररक्षण करू शकलो नाही. क्षेत्ररक्षण करताना फिटनेसकडे दुर्लक्ष करण्यात आले. या ब्रेक दरम्यान आपण आता या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मला माझ्या संघाचा अभिमान असून आम्ही पुन्हा यातून उसळी घेऊ आणि चांगली कामगिरी करू.”

डीआरएसकडेही लक्ष द्यावे लागेलप्रशिक्षक अमोल मुझुमदार

महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनीही मालिका पराभवानंतर फिटनेस आणि खराब क्षेत्ररक्षणाबाबत वक्तव्य केले होते तसेच, त्यांनी आपल्या वक्तव्यात संघाच्या चुकीच्या डीआरएसचाही उल्लेख केला होता. मजुमदार म्हणाले की, “आता आपल्याला फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि डीआरएसवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हे सर्व खेळाडूंच्या अंगवळणी पडण्याबरोबरच त्यात सातत्याने सुधारणा करणेही गरजेचे आहे. मी आधीच सांगितले आहे की हे गेम चेंजर ठरू शकते आणि डब्ल्यूपीएल अपील वेळी याची सवय झाली पाहिजे.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा टी-२० मालिका झाल्या आहेत, ज्यामध्ये भारताने २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियात एक मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने पाच मालिका जिंकल्या आहेत. भारताने एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चांगली सुरुवात केली होती, मात्र एकदिवसीय सामन्यात अ‍ॅलिसा हिलीच्या संघाने भारतीय संघाचा ०-३ असा धुव्वा उडवला.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: पहिल्या टी-२० मध्ये भारताची प्लेइंग-११ कशी असेल? कर्णधार रोहितने अफगाण फिरकीविरोधात आखली योजना

यानंतर टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून मोठा विजय मिळवला, मात्र दुसऱ्या टी-२०मध्ये अ‍ॅलिस पेरी आणि किम गर्थ यांनी खेळला. त्यांच्या ३००व्या सामन्याने मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती. आता तिसर्‍या टी-२०मध्ये हीलीने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि आपल्या संघासाठी मालिका जिंकली.