scorecardresearch

Premium

World Cup 2023: “हे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण नाही…”, बुमराह-शमी आणि सिराज या त्रिकुटावर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य

Sourav Ganguly on Team India: स्पर्धा आता बाद फेरीच्या दिशेने जात असताना, भारताचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम असल्याची चर्चा आहे. यावर सौरव गांगुलीचे दुमत असल्याचे पाहायला मिळत आहे.

World Cup: This is not the best bowling attack Sourav Ganguly's big statement on the trio of Bumrah-Shami and Siraj
गांगुली म्हणाला, मी असे म्हणू शकत नाही की हे भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Sourav Ganguly on Team India: सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे कारण, यजमानांनी स्पर्धेवर स्पष्टपणे वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या सर्व आठ सामन्यांमध्ये ते अपराजित राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात चांगली कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या संघांविरुद्ध मोठे विजय नोंदवले आहेत. भारताचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम असल्याची चर्चा आहे. यावर सौरव गांगुलीचे वेगळे मत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या विश्वचषकात भारतासाठी निश्चितपणे छाप सोडणारा एक घटक म्हणजे त्यांचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ज्यामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. हे त्रिकूट खरोखरच जबरदस्त अशा स्वरुपाची गोलंदाजी करत आहे. त्यांनी या विश्वचषकात एकूण ४१ विकेट्स घेतल्या आहेत. एवढी चांगली कामगिरी केलेली असूनही माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते हे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्कृष्ट नाही.

india vs england 3rd test playing xi sarfaraz jurel set for debut
अननुभवी मधल्या फळीची कसोटी! भारत इंग्लंड तिसरा सामना आजपासून; सर्फराज, जुरेलच्या पदार्पणाची शक्यता
Jasprit Bumrah First Reaction Slams Critics With Hard Post After Becoming Number One Test Cricket Bowler IND vs ENG Highlights
जसप्रीत बुमराहची ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया; सणसणीत उत्तर देत टीकाकारांना लावली चपराक
Indian team restricted England to 253 runs in the first innings
IND vs ENG : बुमराहसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १४३ धावांची आघाडी
india vs england ks bharat believes indian team will make strong comeback in second test
इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास

स्पर्धा आता बाद फेरीच्या दिशेने जात असताना, भारताचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम असल्याची चर्चा आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे. त्याच्यामते २००३च्या विश्वचषकातील भारताचे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्तम होते आणि त्याने हे उदाहरण देत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: PAK vs ENG: “टीव्हीवर बसून मत मांडणं सोपं…”, बाबर आझमने टीकाकारांवर साधला निशाणा

गांगुली म्हणाला, “मी असे म्हणू शकत नाही की हे भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. २००३च्या विश्वचषकात आशिष नेहरा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनीही शानदार गोलंदाजी केली होती.” गांगुली पुढे म्हणाला, “होय, बुमराह, शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहून खूप समाधान वाटत आहे. जेव्हा तुमच्याकडे बुमराह असेल तेव्हा खूप फरक पडतो. दोन्ही बाजूंनी दबाव असतो कारण तो नेहमी जोडीदाराला मदत करत असतो. बुमराहचा इतर दोघांवरही खूप मोठा प्रभाव पडला आहे.”

सध्या सुरू असलेल्या विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यांसाठी शमीला संघातून वगळण्यात आले आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच स्टार वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करायला हवा होता, असे गांगुलीने मान्य केले. तो म्हणाला, “हो, शमीला प्लेइंग-११ मध्ये खूप आधी खेळायला हवे होते. त्याने केलेली ही प्रभावशाली कामगिरी पाहता त्याचे संघात असणे टीम इंडियासाठी फायद्याचे आहे”. टीम इंडिया आता रविवारी बंगळुरू येथे विश्वचषक २०२३च्या अंतिम साखळी टप्प्यातील सामन्यात नेदरलँड्सशी भिडणार आहे.

हेही वाचा: World Cup 2023: “भारताकडून काहीतरी शिका…”, विश्वचषकातील खराब कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने PCBला सुनावले

सौरव गांगुलीचा मुद्दा इथे दुर्लक्षित करता येणार नाही. जेव्हा त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत २००३च्‍या विश्‍वचषकात शानदार कामगिरी केली होती, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. या स्पर्धेत झहीर खानने १८, श्रीनाथने १६ आणि आशिष नेहराने १५ विकेट्स घेतल्या होत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 its not the best bowling attack sourav ganguly on bumrah shami and siraj trio avw

First published on: 11-11-2023 at 17:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×