न्यूयॉर्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूजर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर १९ जुलै रोजी खेळवला जाईल. फुटबॉलची जागतिक संघटना असलेल्या ‘फिफा’ने सोमवारी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळी प्रथमच ही स्पर्धा ४८ देशांच्या सहभागासह आणि तीन देशांच्या सह यजमानपदाखाली होणार आहे. मॅनहटनपासून १० मैलांवर स्थित असलेले हे मैदान १९ जुलै रौजी अवघ्या जगाचे केंद्रिबदू ठरेल.

ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेची सुरुवात ११ जून रोजी मेक्सिको सिटीमधील अ‍ॅझटेका स्टेडियमवर होणार आहे. अंतिम लढतीच्या यजमानपदासाठी न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया स्पर्धेत होते. यामध्ये न्यूयॉर्कने बाजी मारली. अर्थात, कॅलिफोर्नियातील डल्लास शहरात उपांत्य फेरीच्या सामन्याचे यजमानपद मिळाले. दुसरा उपांत्य सामना अ‍ॅटलांटा येथे होणार आहे.

हेही वाचा >>>IND vs ENG : अश्विनच्या ५००व्या कसोटी विकेटवरुन गोंधळ, पहिल्यांदा अंपायरने दिले आऊट नंतर बदलला निर्णय

अंतिम सामना होणारे मेटलाइफ स्टेडियमची क्षमता ८२,५०० इतकी असून, यापूर्वी २०१६ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेची अंतिम लढत येथे झाली होती. अमेरिकेच्या देशांतर्गत स्पर्धेतील न्यूयॉर्क जायंट्स आणि न्यूयॉर्क जेट्स या संघांचे हे हक्काचे स्टेडियम आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने १४ आणि १५ जुलै २०२६ रोजी होतील. तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना १८ जुलैला हार्ड रॉक येथे होईल. अमेरिका आपला पहिला सामना १२ जून रोजी सोफी येथे खेळेल. कॅनडा संघ त्याचदिवशी टोरंटोत आपला पहिला सामना खेळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅझटेकवर तिसऱ्यांदा सलामीची लढत

मेक्सिको सिटी शहरातील अ‍ॅझटेक स्टेडियमला तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. यापूर्वी १९७० आणि १९८६ या स्पर्धेतही उद्घाटनाची लढत येथेच खेळविण्यात आली होती.