WPL 2024 Final, RCB vs DC Match : डब्ल्यूपीएल २०२४ मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबईला धूळ चारल्यानंतर स्मृतीचा आरसीबी संघ विजेतेपद पटकावण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग दोन बाद फेरीत मुंबईचा पराभव करत बंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल स्मृती मंधानाच्या सेनेने रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून इतिहास रचला. या सामन्यात आरसीबीने मुंबईविरुद्ध बचाव केलेली ही धावसंख्या डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होती. आता आरसीबी चाहत्यांना स्मृती सेना विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण करेल का? अशी हुरहुर लागली आहे. आरसीबी रविवारी अंतिम सामन्यात दिल्लीचा सामना करणार आहे.

आरसीबीने मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १३५ धावा केल्या होत्या, तेव्हा मुंबई हा सामना सहज जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करेल असे वाटत होते, परंतु आरसीबीने या छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यात यश मिळवले. आता कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष १७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे.

Rohit Sharma on Mumbai Indians captaincy
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

विराट कोहलीचे स्वप्नही होणार पूर्ण –

आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील डब्ल्यूपीएल २०२४ चा अंतिम सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. या हंगामात डब्ल्यूपीएलचा विजेता एक नवीन संघ असेल. दिल्ली आणि आरसीबीला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही, आता अंतिम सामन्यात कोण आपला झेंडा फडकवणार हे पाहायचे आहे. आयपीएल संघ आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचेही स्वप्न आहे की आरसीबीने ट्रॉफी जिंकावी. २००८ पासून आयपीएल खेळले जात आहे, मात्र आजपर्यंत कोहलीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. आता स्मृती मंधाना कोहलीचे स्वप्न पूर्ण करू शकते.

हेही वाचा – WPL 2024 : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर स्मृती मंधाना भावुक, सांगितला सामन्यातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉइंट’

१६ वर्षांचा दुष्काळ संपणार?

आरसीबी डब्ल्यूपीएलमध्ये जिंकल्यास १६ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल. २००८ पासून आरसीबीचे करोडो चाहते त्यांच्या संघाने एकदा तरी ट्रॉफी जिंकण्याची वाट पाहत आहेत. मात्र विराट कोहलीच्या संघाला आतापर्यंत यात अपयश आले आहे. आता डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये आरसीबी जिंकताच त्या करोडो चाहत्यांची स्वप्नेही पूर्ण होतील.

हेही वाचा – All England Open: लक्ष्य सेनचा ऑल इंग्लंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश, उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्याला चारली धूळ

एलिस पेरी ठरत आहे संकटमोचक –

आरसीबीची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नॉकआऊट लीग सामन्यात मुंबईला पराभूत करण्यात या खेळाडूने सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका बजावली, त्यानंतर एलिमिनेटर सामन्यातही तिने स्फोटक खेळी खेळली. याच कारणामुळे पेरीला दोन्ही सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले. याआधी या खेळाडूने मुंबईविरुद्धच्या साखळी सामन्यात ४ षटकात अवघ्या १५ धावा देऊन ६ बळी घेतले होते. यानंतर तिने बॅटने ४० हून अधिक धावाही केल्या. यानंतर, एलिमिनेटर सामन्यातही पेरीने विस्कळीत होणाऱ्या आरसीबीची फलंदाजीमध्ये धुरा सांभाळली आणि ५० चेंडूत ६६ धावा केल्या, ज्यामुळे बंगळुरू संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला.