India vs Australia, WTC 2023 Final: ओव्हल येथे शनिवारी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४४४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे, त्याआधी कॅमेरून ग्रीनने घेतलेल्या वादग्रस्त झेलमुळे शुबमन गिल बाद झाल्याची चर्चा बरीच रंगली. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील मजेशीर संवादाचे वर्णन केले. ते स्वत: या गोष्टीचे साक्षीदार होते. त्यांनी स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात झालेलं स्लेजिंग उघड केल आहे.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहली चौथ्या दिवशी नाबाद ४४ धावा करून खेळपट्टीवर उभा आहे. त्यावेळी लँगरने ऑन-एअर बोलताना सांगितले की, “तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला स्मिथशी संवाद साधत असताना ही गोष्ट घडली. तिसऱ्या दिवशी स्मिथ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर टिप्पणी केली. परंतु त्यावर स्मिथने दिलेल्या उत्तराने लँगर आश्चर्यचकित झाला.

लँगरने याबाबतीत बोलताना सांगितले, “विराट कोहली स्टीव्ह स्मिथकडे गेला आणि कालचा शॉट हा अतिशय खराब होता असे सांगितले.” लँगरने ‘चॅनल 7’ वर केलेल्या कॉमेंट्री दरम्यान हा खुलासा केला. स्टीव्ह स्मिथने फक्त कोहलीकडे पाहिले. इतर दुसऱ्या कोणत्या खेळाडूने कोणी सांगितले असते तर तो काहीही बोलून गेला असता. पण स्मिथ म्हणाला, “तू बरोबर म्हणत आहे, तो खरच एक फालतू शॉट होता.”

पुढे लँगर म्हणाला, “जर हीच गोष्ट ९९.९ टक्के लोकानी स्टीव्ह स्मिथला सांगितले असते तर त्याने त्याकडे दुर्लक्ष केले असते. पण विराटसारख्या एका हुशार खेळाडूकडून आलेल्या प्रतिक्रियेवर त्याने लगेच मान्य केले.  या घटनेचे कोणतेही फुटेज नसताना, आयसीसीने लगेच लँगरच्या व्यक्तव्याची क्लिप या मथळ्यासह शेअर केली, “कोहली आणि स्मिथ दिग्गज फलंदाज.”

पहिल्या डावात स्मिथने केलेल्या शानदार खेळीसह ३१ कसोटी शतके करणारा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज बनला होता, परंतु दुसऱ्या डावात त्याने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चुकीचा फटका मारल्याने तो बाद झाला. फिरकीपटू जाडेजाच्या चेंडूवर मिड-विकेटकडे शॉट मारू पाहत होता, पण तो थेट कव्हरवर असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि स्मिथने स्वत:ची विकेट गमावली.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “४५० धावांचा पाठलाग करणार त्यांनी…”, शार्दुल ठाकूरच्या विधानाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची उडाली झोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्या दिवशी कोहलीने अशी कोणतीही चूक केली नाही त्यामुळे पूर्ण नियंत्रणात खेळत असल्याकारणाने  तो दिवस संपताना नाबाद ४४ धावांवर राहिला. WTC फायनल मध्ये इतिहास रचण्यासाठी भारताला आता आणखी २८० धावांची गरज असून टीम इंडियाच्या हातात सात विकेट्स शिल्लक आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार संघांनी चौथ्या डावात जिंकण्यासाठी ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत ज्यात २००३ मध्ये वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या ४१८ धावा या आतापर्यंतचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग आहे.