WTC Final Commentary Panel List: आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या फायनलसाठी पूर्ण तयारी केली आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक, टीव्ही आणि स्मार्टफोनवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांना सामना पाहण्याचा वेगळा अनुभव मिळणार आहे. आयसीसीने समालोचन पॅनेलही जाहीर केले असून त्यात ४ भारतीय दिग्गजांचा समावेश आहे. जगातील तब्बल १०० देशात या सामन्याचे प्रसारण होणार असून डब्ल्यूटीसी २०२३ फायनलसाठी आयसीसीने १० दिग्गजांचे पॅनेल बनवले आहे.

समालोचन पॅनेलमध्ये रवी शास्त्री, रिकी पॉंटिंग, सुनील गावसकर, मॅथ्यू हेडन, नासेर हुसेन आणि कुमार संगकारा यांच्याशिवाय हर्षा भोगले, एलिसन मिशेल, दिनेश कार्तिक आणि जस्टिन लँगर यांचा समावेश आहे, यांची कॉमेंट्री चाहते इंग्रजी भाषेत ऐकू शकतील. भारताकडून ज्यांची कॉमेंट्री ही चाहत्यांमध्ये जोश आणते असे रवी शास्त्री शास्त्री यांचा देखील यात समावेश आहे तसेच, सुनील गावसकर, हर्षा भोगले आणि दिनेश कार्तिक. ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, अॅलिसन मिशेल आणि जस्टिन लँगर आहेत.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

स्टार स्पोर्ट्सवरील हिंदी कॉमेंट्रीमध्ये तुम्हाला हरभजन सिंग, सौरव गांगुली, दीपदास गुप्ता, एस श्रीशांत आणि जतिन सप्रू यांचे आवाज ऐकू येतील. वेळोवेळी सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांना हिंदीतही ऐकायला मिळायचे. याशिवाय काही मॅच प्रेझेंटर्स असतील. डिस्ने प्लस हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर ते प्रसारित केले जाईल.

ICC नुसार, शानदार कव्हरेजसाठी ओव्हलच्या मैदानात जमिनीवर किमान ३५ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या विजेतेपदाच्या सामन्यात, डीआरएस सेवेशिवाय, तुम्हाला बॉल ट्रॅकिंग आणि हॉक-आय सारख्या सुविधा देखील मिळतील. इतर मोठ्या सामन्यांप्रमाणे, ड्रोन कॅमेरे, बग्गी कॅम आणि स्पायडरकॅमद्वारे कव्हरेज असेल. अक्षरशः ३६० डिग्री दृश्य पाहायला मिळणार आहे. या सामन्याचे जगात १०० देशांमध्ये प्रसारित केले जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी समालोचकांची यादी

इंग्रजी:- रवी शास्त्री, सुनील गावसकर, मॅथ्यू हेडन, नासेर हुसेन

हिंदी:- हरभजन सिंग, सौरव गांगुली, दीप दासगुप्ता, जतीन सप्रू आणि एस श्रीशांत

तमिळ: यो महेश, एस. रमेश, लक्ष्मीपती बालाजी, एस. श्रीराम

तेलुगु:- कार्तिक एनसी, आशिष रेड्डी, टी. सुमन आणि कल्याण के.

कन्नड:- विजय भारद्वाज, श्रीनिवास एम., भरत चिपली, पवन देश पांडे आणि सुनील जे.

पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत असून त्यांनी २३ षटकात २ बाद ७३ अशी केली आहे. दोन धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा उस्मान ख्वाजा खाते न उघडताच बाद झाला आहे. ख्वाजाने १० चेंडूंचा सामना केला आणि मोहम्मद सिराजने त्याला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनल रद्द होण्याच्या भीतीमुळे ICCला तयार कराव्या लागल्या दोन खेळपट्ट्या, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

त्यानंतर वॉर्नर आणि लाबुशेन यांनी डाव सावरला. ७१ धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. शार्दुल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वॉर्नरने ६० चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. शार्दुलच्या चेंडूवर यष्टिरक्षक श्रीकर भरतने त्याचा झेल टिपला. आता स्टीव्ह स्मिथ मार्नस लाबुशेनसोबत क्रीजवर आहे.