scorecardresearch

Premium

WTC: बांगलादेशच्या पराभवाने पाकिस्तान अव्वल स्थानी; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठे बदल, जाणून घ्या भारताची स्थिती

WTC Points Table 2025: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा ४ विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतच्या गुणतालिकेत बदल झाला आहे.

WTC Points Table: Pakistan tops the Test Championship points table India second Know the condition of every team
न्यूझीलंडच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

World Test Championship Points Table 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या चक्रामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. त्याच वेळी, २०२१-२३ दरम्यान खेळल्या गेलेल्या दुस-या आवृत्तीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. आता तिसरी सायकल २०२३-२५ दरम्यान खेळवली जाईल. त्याची सुरुवात झाली आहे आणि या चक्रात दक्षिण आफ्रिका वगळता प्रत्येक संघाने एक मालिका खेळली आहे.

कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या पाकिस्तान संघ अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत आणि सर्व १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्याच वेळी, भारतीय संघ एक मालिका खेळला आहे आणि एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारत ६६.६७ टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Indian team defeated England by 434 runs in the third Test in Rajkot
IND vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताची डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप
Indian u 19 cricket team skipper uday saharan
U19 WC Final : “आमची तयारी चांगली होती, पण..”, पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची प्रतिक्रिया
Nasir Hussain believes Kohli unavailability is a loss for world cricket including India sport news
कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे भारतासह जागतिक क्रिकेटचे नुकसान! इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. या कारणास्तव किवी संघ तिसऱ्या स्थानावर तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना ५० टक्के गुण आहेत. पाचव्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने पाच सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आणि कांगारू संघाचे ३० टक्के गुण आहेत.

WTC Points Table reshuffled

वेस्ट इंडिजने दोन सामने खेळले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे, तर एक पराभव पत्करावा लागला आहे. १६.६७ टक्के गुणांसह हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. सातव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचे १५ टक्के गुण आहेत. इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यांची संख्या आणि विजय-पराजय समान आहे, परंतु दोन्ही संघांमधील गुणांमधील फरक पेनल्टी गुणांमुळे आहे. ऑस्ट्रेलियाकडे १० पेनल्टी गुण आहेत, तर इंग्लंडकडे १९ पेनल्टी गुण आहेत आणि पुन्हा एकदा हा संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा: IND vs PAK U-19 Asia Cup: उदय, आदर्श आणि सचिन दासची शानदार अर्धशतके! भारताचे पाकिस्तानसमोर २६० धावांचे आव्हान

श्रीलंकेने पाकिस्तानबरोबर दोन सामन्यांची मालिका खेळली होती आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे श्रीलंकेचा एकही गुण नाही. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने या चक्रात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आफ्रिकन संघ भारताविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात करणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wtc points table reshuffled know which team gained and lost from bangladeshs defeat avw

First published on: 10-12-2023 at 16:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×