Rohit Sharma clears doubts about ODI and Test retirement : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित म्हणाला होता की तो भारताकडून वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत राहील, पण आता त्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटबद्दलही एक मोठे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषक जिंकला आणि आयसीसी ट्रॉफीचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला होता.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित अमेरिकेतील डलास येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. या कार्यक्रमात जेव्हा रोहितला त्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की तो भविष्याचा जास्त विचार करणारा माणूस नाही, पण भारतीय कर्णधाराने पुढेही खेळण्याची आशा व्यक्त केली. रोहित म्हणाला, ‘मी आधीच सांगितले आहे की, मी फार पुढचा विचार करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे येत्या काही काळासाठी तुम्ही मला खेळताना पाहाल हे स्पष्ट आहे.’

रोहितचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट –

रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ४३३१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक पाच शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. रोहित २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. आता त्याने त्याच्या नेतृत्वाखाली हे विजेतेपदही जिंकले आहे. रोहितबरोबर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेतली. भारताला टी-२० मध्ये नवा कर्णधार मिळेल, पण रोहित वनडे आणि कसोटीत संघाचे नेतृत्व करत राहील.

हेही वाचा – Wimbledon 2024 Prize Money : विजेता अल्काराझ आणि उपविजेता जोकोविचला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना रोहित काय म्हणाला होता?

टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला होता की, “टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. हा माझा शेवटचा सामनाही होता. जेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून मी या फॉरमॅटचा आनंद लुटला आहे. त्यातला प्रत्येक क्षण मला आवडला असून मला हेच हवे होते. तसेच टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न होते, जे आता सत्यात उतरले आहे.”