दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात आशिष नेहराने आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळला. आशिष नेहराने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत होतं. मात्र यावेळी आशिष नेहराचा ड्रेसिंग रुमपार्टनर आणि माजी सहकारी युवराज सिंगने आशिष नेहराशी संबधित एक गोड आठवण आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली. युवराज सिंगने आशिष नेहराच्या टोपण नावाचाही उलगडा केला.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आशिष नेहराला पोपट हे टोपणं नाव ठेवलं होतं. नेहरा ड्रेसिंग रुममध्ये आपल्या बोलक्या स्वभाव आणि सतत हसण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होता. यावेळी सौरवने आशिष नेहराला, तू पाण्याच्या आतही सतत बोलू शकतोस असं म्हणत ‘पोपट’ हे टोपण नाव ठेवलं. युवराजने अतिशय भाऊक होऊन लिहिलेल्या फेसबूक पोस्टमध्ये याचा उलगडा केला आहे.

अवश्य वाचा – Video: नेहराजींचं ‘फुटवर्क’ आणि कर्णधार कोहलीही अचंबित !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ वर्षे भारतीय क्रिकेटच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या आशिष नेहराने मागच्या महिन्यात आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावेळी आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची विनंती नेहराने बीसीसीआयला केली होती, याला मान देत बीसीसीआयच्या निवड समितीने पहिल्या टी-२० साठी आशिष नेहराची संघात निवड केली. काल झालेल्या सामन्यात आशिष नेहराला एकही बळी मिळाला नाही. त्याच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने न्यूझीलंडच्या फलंदाजांचे झेल टाकले. मात्र सामन्यात अखेरचं षटक टाकल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवनला आपल्या खांद्यावर उचलत त्याला निरोप दिला.

अवश्य वाचा – ….म्हणून आशिष नेहराचा आयपीएललाही रामराम