एजबेस्टन कसोटीत शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने हाहाकार उडवला आहे. गिल उत्कृष्ट फॉर्मात असून त्याने द्विशतक झळकावलं आहे. शुबमन गिलने या द्विशतकासह मोठे विक्रम रचले आहेत. लीड्स कसोटीत शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावले आणि आता त्याने दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले आहे. त्याच्या या द्विशतकावर युवराज सिंगने पोस्ट शेअर केली आहे.

शुभमन गिलने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत. पण एजबॅस्टन कसोटीतील त्याचे द्विशतक हे सर्वोत्तम डावांपैकी एक आहे. शुबमन गिलने द्विशतकानंतर २५० धावांचा पल्ला गाठला. २५४ धावा करताच तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळणारा कर्णधार ठरला. गिलने ३११ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह २०० धावा केल्या. तर गिल दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातही २६५ धावा करत नाबाद परतला आहे.

शुबमन गिलने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगकडे क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. युवराजच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटमधील बारकावे शिकत भारतीय संघात स्थान मिळवलं. शुबमनच्या प्रत्येक खेळीवर त्याच्या विक्रमांवर आणि कामगिरीवर युवराज सिंग ट्विट पोस्ट करत असतो. तसंच त्याच्या या विक्रमी द्विशतकावरही त्याने फोटो शेअेर करत पोस्ट केली आहे.

युवराज सिंगने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “महत्त्वाच्या सामन्यात अशी अफलातून खेळी साकारणं खास आहे. तुझ्या खेळीत सहजता होती, फटक्यांवर प्रभुत्व होतं. मनात किंतुपरंतु नसले की मॅरेथॉन खेळी साकारता येते हे तू दाखवून दिलंस.”

शुबमन गिलने लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच कर्णधार गिलने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावले. पण गेल्या सामन्यात गिल १४७ धावा करून बाद झाला. यावेळी भारतीय कर्णधाराने कसोटी क्रिकेटमधील त्याचे पहिले द्विशतक झळकावले. यासह, तो इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार आणि एकूण तिसरा भारतीय फलंदाज बनला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलकडे त्रिशतक झळकावण्याची मोठी संधी होती. पण तो २६९ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिल ३८७ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांसह २६९ धावा करत माघारी परतला. टंगच्या गोलंदाजीवर तो हलक्या हाताने पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पण त्याने भारताला एका मोठ्या धावसंख्येच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.