News Flash

BS6 इंजिनसह आली नवीन Honda Shine , मायलेज वाढला; किंमत किती?

खरेदीवर कंपनीकडून मिळणार 'ही' स्पेशल ऑफरही

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 125cc बाइकपैकी एक Honda Shine ही बाइक ‘होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया’ने (HMSI)अपडेटेड BS6 इंजिनसह लाँच केली आहे. नव्या होंडा शाइनमध्ये नवीन 5 स्पीड ट्रान्समिशन आणि फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात असून ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाइक उपलब्ध असेल.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

नवीन BS6 इंजिन होंडा शाइन ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिअंट्समध्ये आली आहे. ही बाइक रेबेल रेड मेटेलिक, जेनी ग्रे मेटेलिक,
ऑथेंटिक ब्लू मॅटेलिक आणि ब्लॅक या चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून अपडेटेड शाइनसोबत स्पेशल 6 वर्षांची वॉरंटी पॅकेजची ऑफरही आहे. यामध्ये 3 वर्षे स्टँडर्ड वॉरंटी आणि 3 वर्षे पर्यायी एक्सटेंडेड वॉरंटीचा समावेश आहे. बाइकमध्ये 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून ग्राउंड क्लीअरंस आणि व्हिलबेस अनुक्रमे 5mm आणि 19mm वाढवण्यात आला आहे. याशिवाय बाइकमध्ये नवीन DC हेडलँप, इंटीग्रेटेड हेडलँप बीम आणि पासिंग स्विच आहे. बाइकच्या सीटची लांबी 27mm असून बाइकमध्ये 5 स्टेप अॅड्जस्टेबल रिअर सस्पेंशन आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) आहे.

(आणखी वाचा – Hero ने आणली ‘झकास’ बाइक, Pulsar-Apache ला टक्कर)

इंजिन –
बाइकमधील नवीन फ्युअल इंजेक्टेड 125cc इंजिन, जुन्या Honda CB Shine पेक्षा अधिक ऊर्जा आणि टॉर्क निर्माण करते. नवीन इंजिन 7500 rpm वर 10.72 bhp ची ऊर्जा आणि 6,000 rpm वर 10.9Nm पीक टॉर्क निर्माण करतं. याशिवाय नव्या इंजिनमध्ये सायलेंट स्टार्टरसोबत एनहान्स्ड स्मार्ट पावर (eSP) देण्यात आले आहे. बाइकच्या मागे लो-रेजिस्टन्स ट्युबलेस टायर आहेत , हे टायर ऑप्टिमम ग्रिप कायम ठेवतात आणि एनर्जी लॉस कमी होतो. नव्या इंजिनमुळे बाइकची इंधन कार्यक्षमता 14 टक्क्यांनी वाढलीये, त्यामुळे नवीन शाइन जुन्या गाडीच्या तुलनेत अधिक दमदार मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

(आणखी वाचा – तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका)

किंमत –
BS6 Honda Shine ची एक्स-शोरूम किंमत 67 हजार 857 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 8:42 am

Web Title: 2020 honda shine bs6 launched in india at price from rs 67857 know specifications and other details sas 89
टॅग : Honda
Next Stories
1 विदेशात फिरायला जाताय? मग आरोग्याच्या घ्या अशी काळजी
2 प्रोटीनचा फायदा आणि तोटा काय ?
3 25 फेब्रुवारीपर्यंत ‘स्पेशल सेल’, Xiaomi चा स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी