कृती

कुकरमध्ये तेल गरम करा. त्यावर जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करा. आवडत असल्यास कढिपत्ता घाला. त्यावर हळद, मीठ, काळीमिरी पूड व चिरलेला दुधी घाला. २ वाटय़ा पाणी घालून दुधी मऊ शिजवून घ्या. नंतर नारळाच्या दुधात बेसन मिसळून ते मिश्रण कुकरमध्ये ओता. त्याला मंद गॅसवर छान उकळी काढा. दुधीऐवजी शेवग्याच्या शेंगाही वापरता येतील.

साहित्य

अर्धा किलो दुधी भोपळा, अर्धा चमचा मोहरी व जिरे, हळद, २ चमचे काळीमिरी पूड, २ वाटय़ा नारळाचे दूध, २ चमचे बेसन किंवा तांदळाचे पीठ, मीठ, २ पळ्या तेल, कोथिंबीर, चिमूटभर हिंग