गुगलने मार्च महिन्यात डायनॅमिक ईमेल फीचरची घोषणा केली होती. तसेच हे फीचर Gmail युझर्सचे ईमेल वाचण्याची आणि रिप्लाय देण्याची पद्धत बदलणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्याही ईमेलपुढे लाईटनिंग बोल्ट पाहून हा डायनॅमिक ईमेल आहे अथवा नाही याची माहिती मिळेल. दरम्यान, लवकरच सर्वांसाठीच हे फीचर लाँच करण्यात येणार असल्याची माहिती गुगलने एका ब्लॉगपोस्टद्वारे दिली आहे. जुलै महिन्यापासून Gmail च्या युझर्सना या नव्या फीचरचा लाभ घेता येईल, अशी माहिती समोर आली आहे.

डायनॅमिक ईमेल्सच्या मदतीने युझर्स मेसेजमध्ये असतानाही ईमेलला रिप्लाय देण्यासारखे किंवा अन्य कोणत्याही गोष्टी करू शकतील. मेसेजमध्येच असताना त्यामुळे रिप्लाय देणे शक्य होणार आहे. दरम्यान, गुगलने हे फीचर अनाऊंस केल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्यांना सुरूवातीला काही गाईडलाईन्सचे पालन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर ईमेल पाठवण्यापूर्वी Gmail त्या मेलचे रिव्ह्यू करेल. डायनॅमिक ईमेल्स गेल्या वर्षी एएमपी फॉर ईमेल्स प्रोजेक्टवर आधारित आहे. स्टॅटीक इंटरॅक्टीव्ह पेज तयार करण्याच्या उद्देशाने याची सुरूवात करण्यात आली होती. मायक्रोसॉफ्ट आउटलुक, mail.ru आणि याहू मेल यापूर्वीपासूनच एएमपी पेजला सपोर्ट करत आहेत.

डायनॅमिक ईमेलचा वापरचा करायचा असल्यास जीमेलच्या साईनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन डायनॅमिक ईमेलचे ऑप्शन अनेबल करावे लागेल.