खरेदी ही सध्या अतिशय सामान्य गोष्ट आहे. कधी सणांसाठी तर कधी एखाद्या समारंभासाठी, काहीच नाही तर हौस म्हणून शॉपिंग करण्याचे फॅड हल्ली वाढत आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत खरेदी करणे ही तर एक पर्वणीच असते. मात्र अशाप्रकारे खरेदीसाठी बाहेर गेल्यावर आपल्याला खर्चाचे भान राहत नसेल आणि आपले आर्थिक गणित चुकत असेल तर थोडंसं थांबून विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही खास टिप्स…

बजेट तयार करा आणि त्यानुसारच व्यवहार करा

खरेदीला जाण्याआधी तुमच्या खर्चाचं बजेट तयार करा. प्रत्येक गोष्टीच्या खरेदीसाठी बाबीसाठी पैसे वेगवेगळे काढा. यामुळे तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. ज्या गोष्टींची विशेष गरज नाही, त्या लगेचच न खरेदी करता आधी बाजूला काढा आणि सर्वात शेवटी खरेदी करा.

ऑनलाईन तुलना करा आणि खरेदी करा 

तुलनात्मक किमतीत तुमच्या सोयीप्रमाणे रिमोटली खरेदी करण्याचा आनंद लुटण्यासाठी ऑनलाईन जा. ऑनलाईन वाढत्या स्पर्धेमुळे स्टोअर्सना इतरांपेक्षा चांगली विक्री करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट द्यावे लागते. प्रोमो कोड्‌स, व्हाऊचर्स आणि कूपन्सचा वापर आणखी बचत करण्यासाठी करा. खूप आक्रमकपणे ब्राऊझिंग न करताही कंपॅरिझन साईट्‌स आणि ॲग्रिगेटर्स तुम्हाला अनेक पर्याय देऊ शकतात. रिटेलर्सनी क्रेडिट कार्ड/ई-वॉलेट कंपन्यांसोबत टाय-अपच्या माध्यमातून दिलेले कॅशबॅक्स, रिवॉर्ड पॉईंट्‌स आणि इतर एक्सक्ल्युझिव्ह ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्ड्‌सचा आणि ई-वॉलेटचा उपयोग करा.

वैयक्तिक भेटवस्तूंचा पर्याय निवडा

सुट्टीमध्ये आणि सणासुदीला भेटवस्तू देणे ही महत्त्वाची गोष्ट असते. परंतु भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही किफायतशीर मार्ग शोधू शकता. महागड्या वस्तू खरेदी करण्याऐवजी पेंटिंग्ज किंवा हँडिक्राफ्टच्या वस्तू यांसारख्या पर्सनलाईझ्ड वस्तूंची निवड करा. या भेटवस्तूंसाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही आणि त्यांची निवड तुम्ही विचारपूर्वक केलेली आहे हेही दिसून येईल व सोबत तुमच्या भावनाही पोहचतील.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार