News Flash

ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी धनश्रीच्या गॅरेजमध्ये रांगा

सुरुवातीपासूनच वेगळी वाटचाल चोखाळणाऱ्या धनश्रीने याच करोनाकाळात कमाईचा नाही तर कामाचा वेगळा मार्ग निवडला.

यांत्रिकी अभियंता झाल्यावर जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली

नागपूर : ट्रॅक्टर दुरुस्ती हे नाजूक हातांचे काम नाही. त्यासाठी पुरुषी हातांचीच गरज असते, हा समज खोटा ठरवला  तो भंडारा जिल्ह्य़ातील साकोलीच्या अवघ्या २२-२३ वर्षांच्या धनश्री हातझाडे या तरुणीने. यांत्रिकी अभियंता झालेल्या धनश्रीला खरे तर टाटा, महिंद्रा सारख्या वाहनांच्या मोठय़ा कंपन्यांमधील वातानुकू लित कार्यालयात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवू शकली असती. पण तिने ही आरामदायी वाटचाल नाकारत खडतर वाट स्वीकारली. अवघ्या काही दिवसातच ट्रॅक्टर दुरुस्तीचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या धनश्रीकडूनच ते काम करून घेण्यासाठी आता रांगा लागतात.

करोनाकाळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या तर उच्चशिक्षित तरुणाईला भविष्यातील नोकरीच्या चिंतेने ग्रासले. मात्र, सुरुवातीपासूनच वेगळी वाटचाल चोखाळणाऱ्या धनश्रीने याच करोनाकाळात कमाईचा नाही तर कामाचा वेगळा मार्ग निवडला. टाळेबंदीच्या काळात साकोलीतील वडिलांच्या गॅरेजमधील कामगार येईनासे झाले. अवघ्या दोन कामगारांच्या बळावर नऊ ट्रॅक्टरच्या दुरुस्तीचा मोठा प्रश्न तिच्या वडिलांसमोर होता. बोलून दाखवले नसले तरीही वडिलांची चिंता तिने ओळखली आणि हे आव्हान तिने स्वीकारले. एवढेच नाही तर ते यशस्वीरित्या पेलले. धनश्रीच्या निर्णयामुळे तिच्या वडिलांसमोर उभा ठाकलेला हा मोठा प्रश्न सुटला. अफाट निरीक्षणक्षमता असणाऱ्या धनश्रीचा पहिल्याच दिवशीचा प्रवास वडिलांना अचंबित करून गेला. ट्रॅक्टरचे मोठमोठे नटबोल्ट आपली मुलगी खोलू शके ल का, अशी शंका मनात असताना काही दिवसातच सराईत कामगारांसारखे तिने हे कौशल्य आत्मसात के ले. सुरुवातीला गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ट्रॅक्टर आणणारे लोक ही मुलगी काय करणार, याच नजरेतून तिच्याकडे बघत होते. तिच्याकडून दुरुस्ती करून घ्यायला तयार नव्हते आणि करून घेतले तरीही इतर पुरुष कामगारांकडून के लेल्या कामाची चाचपणी करत होते. कामातील प्रामाणिकता आणि अचूकतेच्या बळावर तिने त्यांचाही विश्वास जिंकला. आता हेच लोक तिच्याकडून काम करून घेण्यासाठी तत्पर असतात. इतर कामगारांप्रमाणेच ती वडिलांच्या तीन दशके  जुन्या गॅरेजमध्ये काम करते. तिच्या कामात कु ठेही यांत्रिकी अभियंता असल्याचा अविर्भाव नसतो. ग्राहकांशी ती तेवढय़ाच नम्रपणाने वागते आणि त्यांच्या वाहनातील समस्या दूर करते.

वडिलांचे काम लहानपणापासून बघत आले. तेव्हापासूनच त्यांना हातभार लावण्याचे लक्ष्य होते. यांत्रिकी अभियंता झाल्यानंतर टाळेबंदीने या लक्ष्यपूर्तीची संधी दिली. तू मुलगी आहे, तुला काय करणार, ताकद कशी लागणार असे शब्द गॅरेजमध्ये कानावर पडायचे. काम पूर्ण झाल्यानंतरही ग्राहक पुरुष कामगारांना ते एकदा तपासायला लावायचे. आता ग्राहक स्वत:हून त्यांच्या वाहनाची समस्या सांगतात. पहिला ट्रॅक्टर दुरुस्त के ला तो क्षण कायम आठवणीत राहणारा आहे. हे काम सुरु झाल्यानंतर महिंद्रासारख्या कं पन्यांमधून नोकरीसाठी विचारणा झाली. माझा निर्णय मात्र झालेला आहे. गावातच राहून वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे.

– धनश्री हातझाडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 3:06 am

Web Title: mechanical engineer dhanashree open tractor service centers in bhandara zws 70
Next Stories
1 कॉम्प्युटर गेमचीच चलती
2 तुमची नखं तपासून पाहा… हे बदल दिसत असतील तर तुम्हाला करोना संसर्ग होऊन गेलाय असं समजा
3 रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार
Just Now!
X