रेडमीच्या ‘नोट-9’ सीरिजमधील Redmi Note 9 हा बजेट स्मार्टफोन आज (दि.10) पुन्हा एकदा सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.  Redmi Note 9 हा ‘नोट-9’ सीरिजमधील  कंपनीचा तिसरा स्मार्टफोन असून आधीच्या  Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत Redmi Note 9 हा स्मार्टफोन स्वस्त आहे. ग्राहकांना आज हा फोन फ्लॅश-सेलमध्ये खरेदी करता येईल. दुपारी 12 वाजेपासून Redmi Note 9 च्या विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन इंडिया आणि Mi.com च्या वेबसाइटवर सेलला सुरूवात होत आहे.

ऑफर :-
सेलमध्ये Redmi Note 9  च्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. ऑफरनुसार, HSBC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांना पाच टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड होल्डर्सना (प्राइम मेंबर्स)  पाच टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, काही निवडक बँकांच्या कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये Redmi Note 9 हा फोन एप्रिल महिन्यातच लाँच केला होता. पण ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम या दोनच पर्यायांमध्ये आला आहे. पण, भारतीय बाजारात हा फोन अपेक्षेप्रमाणे 6 जीबी रॅमच्या पर्यायासह आला आहे. कंपनीने नवीन Redmi Note 9 हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये आणलाय. मागील बाजूला चार रिअर कॅमेऱ्यांच्या सेटअपसह होल-पंच डिझाइन असलेला हा फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये भारतीय बाजारात आला आहे. अ‍ॅक्वा ग्रीन, आर्क्टिक व्हाइट आणि पेबल ग्रे अशा तीन कलरचे पर्याय या फोनसाठी आहेत.

Redmi Note 9 स्पेसिफिकेशन्स:-
ड्युअल-सिम रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. यात 6.53 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) आयपीएस डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर फीचर असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेस असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय मिळतील. आवश्यकता असल्यास माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह Redmi Note 9 मध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस यांसारख्या फीचर्सता समावेश आहे.

किंमत:-
Redmi Note 9 (4GB रॅम + 64GB स्टोरेज) –  11 हजार 999 रुपये

Redmi Note 9 (4GB रॅम + 128GB स्टोरेज) – 13हजार 999 रुपये

Redmi Note 9 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) – 14 हजार 999 रुपये