27 October 2020

News Flash

पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, फोनमध्ये आहे 5,020mAh ची दमदार बॅटरीही

6.53 इंच फुल-एचडी+आयपीएस डिस्प्लेसोबत 'कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन' आणि फिंगरप्रिंट सेन्सरही

‘शाओमी’ कंपनीने आपला Redmi Note 9 हा बजेट स्मार्टफोन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भारतात लाँच केला. ‘नोट-9’ सीरिजमधील हा कंपनीचा तिसरा स्मार्टफोन आहे. हा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी आहे. हा फोन आज (दि.20) दुपारी 12 वाजेपासून अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबासाइटवर सेलमध्ये उपलब्ध असेल. 48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अनेक फीचर्स आहेत. ‘नोट-9’ सीरिजमधील Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन स्मार्टफोनही भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. पण, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत  एकूण पाच कॅमेरे असलेला Redmi Note 9 हा स्मार्टफोन स्वस्त आहे.

Redmi Note 9 फीचर्स :-
ड्युअल-सिम रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. यात 6.53 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) आयपीएस डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर फीचर असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसर असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय मिळतील. आवश्यकता असल्यास माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड-कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह Redmi Note 9 मध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस यांसारख्या फीचर्सता समावेश आहे.

Redmi Note 9 किंमत:-
Redmi Note 9 (4GB रॅम + 64GB स्टोरेज) – 11 हजार 999 रुपये

Redmi Note 9 (4GB रॅम + 128GB स्टोरेज) – 13हजार 999 रुपये

Redmi Note 9 (6GB रॅम + 128GB स्टोरेज) – 14 हजार 999 रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 11:25 am

Web Title: redmi note 9 with large 5020mah battery on sale via amazon check price and other details sas 89
Next Stories
1 64 MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी; मोटोरोलाच्या One Fusion+ चा आज ‘सेल’, जाणून घ्या ऑफर्स
2 OnePlus ने लाँच केलं नवीन ‘मेड इन इंडिया’ फीचर, जाणून घ्या डिटेल्स
3 Airtel ची ऑफर, ‘या’ खास प्लॅनमध्ये आता 10 पट जास्त डेटा
Just Now!
X