13 August 2020

News Flash

Jio ने पुन्हा आणली ‘ती’ ऑफर, ‘फ्री’मध्ये मिळतोय 2GB एक्स्ट्रा डेटा

लॉकडाउनदरम्यान आणलेली ऑफर पुन्हा एकदा

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर पुन्हा एकदा आणली असून याअंतर्गत ग्राहकांना मोफत हाय स्पीड डेटा देत आहे. सलग चौथ्या महिन्यात कंपनीकडून अखेरच्या चार दिवसांसाठी दररोज 2 जीबी फ्री डेटा दिला जात आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातही कंपनीने ही ऑफर आणली होती.

ही ऑफर आधीप्रमाणेच चार दिवसांच्या वैधतेसह आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा म्हणजे एकूण 8 जीबी डेटा अगदी मोफत दिला जात आहे. जर तुमच्या सध्याच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा वापरण्यास मिळत असेल तर या ऑफरनुसार अखेरचे चार दिवस तुम्हाला 2 जीबीऐवजी 4 (2+2) जीबी डेटा मिळेल. पण, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जातेय.

या ऑफरसाठी ग्राहकांची ‘रँडम’ निवड केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, युजर्स My Jio अ‍ॅपमध्ये जाऊन जिओ डेटा पॅकच्या उपलब्धता चेक करु शकता. जिओ कस्टमर्स MyJio अॅपवर जाऊन ही ऑफर त्यांना लागू होते की नाही याची माहिती घेऊ शकतात. इथे तुम्हाला डेटा पॅक टायटलमध्ये डीटेल्स दिसतील. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत अतिरिक्त डेटाही दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 4:32 pm

Web Title: reliance jio credits 2gb data per day for users get details sas 89
Next Stories
1 फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाताय? सावधान!
2 Realme चे अजून दोन फोन झाले महाग, कंपनीने वाढवली किंमत
3 पब्जीपासून ट्रू-कॉलरपर्यंत, 53 अ‍ॅप्स चोरी करतायेत तुमचा डेटा; बघा संपूर्ण लिस्ट
Just Now!
X