दक्षिण कोरियाच्या Samsung कंपनीने सोमवारी भारतात Galaxy Tab A7 लाँच केला. कंपनीने Galaxy Tab A7 दोन व्हेरिअंटमध्ये  (LTE आणि Wi-Fi) आणला आहे. सॅमसंग Galaxy Tab A7 च्या Wi-Fi व्हेरिअंटची किंमत भारतात 17 हजार 999 रुपये आहे, तर LTE व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Galaxy Tab A7 तीन रंगांच्या पर्यायात (डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्वर) उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (Samsung.com) आणि काही निवडक रिटेल स्टोअर्समध्ये Samsung Galaxy Tab A7 च्या प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. प्री-बूकिंगला सुरूवात झाली असली तरी या टॅबलेटची विक्री कधीपासून सुरू होणार याबाबत मात्र कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. Galaxy Tab A7 साठी प्री-बूकिंग करणाऱ्या ग्राहकांना 4,499 रुपयांचे Keyboard Cover केवळ 1,875 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 2,000 रुपये कॅशबॅकचीही ऑफर आहे. तसेच, प्री-बूकिंग करणाऱ्यांना दोन महिन्यांसाठी YouTube प्रीमियमचं सबस्क्रिप्शनही फ्रीमध्ये मिळणार आहे.

Samsung Galaxy Tab A7 स्पेसिफिकेशन्स :-
-अँड्रॉइड 10 बेस्ड One UI 2.5
-10.4 इंच WUXGA+ (2,000×1,200 पिक्सेल रिझोल्यूशन) TFT डिस्प्ले, 80% स्क्रीन टू बॉडी रेशो
-ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर
-3 GB रॅम, 32 GB स्टोरेज, माइक्रो एसडीकार्ड सपोर्ट 1 TB पर्यंत
-8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
-5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
-7,040mAh बॅटरी
-क्वॉड स्पीकर आणि Dolby Atmos सराउंड साउंड सपोर्ट
-कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ग्लोनस, Beidou, Galileo, 3.5mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी     युएसबी टाइप-सी पोर्ट.