News Flash

Xiaomi Redmi Y2 बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

लवकरच अॅमेझॉनवरुन खरेदी करता येणार

शाओमी कंपनीने आपला नवा स्मार्टफोन बाजारात दाखल करत आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. Xiaomi Redmi Y2 असे या फोनच नाव असून हा फोन सेल्फी फोन म्हणून ओळखला जात आहे. दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हा फोन लाँच करण्यात आला. मागच्या वर्षी कंपनीने लाँच केलेल्या Xiaomi Redmi Y1 या मॉडेलचे हे पुढचे व्हर्जन आहे. याचा सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. हा फोन मेक इन इंडियानुसार बनविण्यात आला असून त्याची निर्मिती भारतात होईल असे कंपनीचे भारताचे प्रमुख मनु कुमार यांनी स्पष्ट केले.

Xiaomi Redmi Y2 या फोनची ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत भारतात ९,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. सध्या हा मोबाईल केवळ अॅमेझॉनवर खरेदी करता येणार आहे. १२ जूनपासून तो फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध होईल. याशिवाय Smartphone Mi Home आणि Mi Home वरही हा फोन उपलब्ध होणार आहे. गडद राखाडी, गोल्ड आणि रोज गोल्ड या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. लाँच होताना कंपनी आपल्या ग्राहकांना काही ऑफर्स देणार आहे. यात एअरटेल ग्राहकांना पहिल्या सेलमध्ये १८०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. याबरोबरच २४० जीबी ४ जी डेटाही मिळेल. याबरोबरच आयसीआयसीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास ५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळू शकेल.

या फोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठीही लाईट देण्यात आल्याने सेल्फी काढणे आणखी सोपे होणार आहे. यात Red Mi Note 5 प्रमाणे ऑटो एचडीआर मोड देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी कॅमेरामध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आली आहेत. या फोनला १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे २ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनला स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची मेमरी ३२ आणि ६४ जीबीवरुन २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. ३०८० मिलिअॅम्पियर्सची बॅटरीही देण्यात आल्याने हा फोन सध्या बाजारात असणाऱ्या इतर फोनला चांगलीच टक्कर देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 5:44 pm

Web Title: xiaomi launch new mobile redmi y2 price in india color features you can buy it from amazon
Next Stories
1 Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय? ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा
2 आयडियाचा १४९ रुपयांचा नवा प्लॅन; एअरटेल आणि बीएसएनएलला टक्कर
3 घरच्या घरी असे बनवा फेस पॅक
Just Now!
X