How To Make Eyebrow Thick: केस हे कोणाच्याही सौंदर्याला चार चांद लावण्याचे काम करतात. अगदी हलकासा हेअरकट केला तरी तुमच्या लूकमध्ये मोठा फरक दिसून येतो. महिलांच्या बाबत तर आयब्रोचे म्हणजेच भुवयांचे केसही लुक बदलण्यात मोठी मदत करतात. तुम्हीच सांगा, महिन्याभराने जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये आयब्रो करून येता तेव्हा लगेच “तुझ्या चेहऱ्यात काहीतरी वेगळं दिसतंय” अशा कमेंट लगेच ऐकू येतात, हो ना? त्यामुळे छान जाड भुवया असाव्यात अशी इच्छा अनेकांची असते. यासाठी मेकअपचा पर्याय आहेच पण जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने भुवया दाट करायच्या असतील तर त्यासाठीही काही घरगुती उपाय आहेत. आज त्यातीलच १० उपाय आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे पर्याय वापरून पाहू शकता.

भुवया जाड करण्यासाठी १० सोपे उपाय (How To Make Eyebrow Thick)

1) एरंडेल तेल: एरंडेल तेल तुमच्या भुवयांना लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. एरंडेल तेल फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहे जे केसांच्या वाढीस मदत करू शकते.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

2) नारळाचे तेल: नारळाचे तेल तुमच्या भुवयांना लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. स्वच्छ धुण्यापूर्वी किमान 30 मिनिटे तसेच राहू द्या. नारळाचे तेल केसांच्या कूपांचे पोषण करण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

3) कांद्याचा रस: छोट्या कांद्याचा रस काढून भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. कांद्याच्या रसामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

4) कोरफड: तुमच्या भुवयांवर ताजे कोरफड जेल/ गर लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. पाण्याने धुण्यापूर्वी ३० मिनिटे तसेच राहू द्या. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.

5) ऑलिव्ह ऑइल: तुमच्या भुवयांना थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. स्वच्छ धुण्यापूर्वी किमान 30 मिनिटे तसेच राहू द्या. ऑलिव्ह ऑइल केसांच्या कूपांना मॉइश्चरायझ करण्यास आणि केसांच्या वाढीस मदत करू शकते.

6) अंड्यातील पिवळ बलक: अंड्यातील पिवळ बलक फेटून ते तुमच्या भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 20-30 मिनिटे तसेच राहू द्या. अंड्यातील पिवळ बलक प्रोटीनयुक्त असल्याने केसांच्या वाढीस मदत करू शकते.

7)मेथी दाणे: एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बियांची पेस्ट बनवून भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी ३० मिनिटे तसेच राहू द्या. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड असते, जे केसांच्या वाढीस मदत करू शकते.

8) ग्रीन टी: एक कप ग्रीन टी तयार करा आणि थंड होऊ द्या. चहामध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.

9) लिंबाचा रस: ताज्या लिंबाचा रस तुमच्या भुवयांवर लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.

हे ही वाचा<< अंतर्वस्त्राचा रंग धुतल्यावर पांढरा- पिवळा का पडतो? शास्त्रीय कारण व उपाय काय?

10) पेट्रोलियम जेली: तुमच्या भुवयांना थोड्या प्रमाणात पेट्रोलियम जेली लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. पेट्रोलियम जेली केसांच्या कूपांना मॉइश्चरायझ करण्यात आणि केसांच्या वाढीस मदत करू शकते

टीप: लक्षात ठेवा हे घरगुती उपाय आहेत, तुमच्या त्वचेला यातील कुठल्याही गोष्टीची ऍलर्जी असल्यास आधी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य ठरेल.